Radhakrishna Vikhe Patil : विखे आश्वी खुर्दचा 'उपसरपंच' ठरवणार ? इच्छुकांकडून एकमेकांची मनधरणी सुरू

Grampanchyat Election News : गाव-गप्पांमध्ये ‛कौन बनेगा उपसरपंच' या चर्चेला उधाण
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिर्डी मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात जागरुक असलेल्या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.उपसरपंच पदावर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आता गावाला लागली आहे. गाव-गप्पांमध्ये ‛कौन बनेगा उपसरपंच' या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जनसेवा कार्यालयातून उपसरपंच पदाचे नाव बंद पाकिटातूनही येण्याची चर्चा रंगली आहे.

आश्वी खुर्द ग्रामपंचायतीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या गटाने दुसऱ्यांदा जनतेतून थेट सरपंचपदासहा 12 सदस्यांपैकी 11 सदस्य निवडून आले आहेत.विरोधी गटाच्या उमेदवाराचे पानिपत झाले, असले तरी विरोधी गटाला मात्र एका जागेवर समाधान मानावे लागले. पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच अलका गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची पहिली मासिक बैठक गुरूवारी (ता. 23) सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe Patil
Bhandara Sarkarnama Impact : ‘न्यूड डान्स’ प्रकरणी गोबरवाहीतील पोलिस निलंबित

या बैठकीत उपसरपंच(Upsarpanch) निवड होईल. गावचा उपसरपंच कोण होणार याविषयी स्थानिकांमध्ये चर्चा रंगली असली. सदस्यांमध्ये 'आपणच' अशी चर्चा रंगली आहे. काही इच्छुकांनी एकमेकांची मनधरणी सुरू केली आहे.

आश्वी खुर्दच्या स्थानिक राजकारणात पदांचा व आडनांवाचा समतोलपणा राखण्याची पंरपरा पूर्वीपासून आहे. यावेळी पद सर्वसाधारण महिला उमेदवाराच्या वाट्याला आले आहे. गावात 35 टक्के लोकसंख्या असलेल्या गायकवाड आडनावासं अपेक्षेप्रमाणे सरपंचपद मिळाले. आता उपसरपंच पदासाठी इतरांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. (Grampanchyat Election)

उपसरपंच पदासाठी सोपान सोनवणे आणि बाबा भवर यांच्या रस्सीखेच सुरू आहे. यात कोण बाजी मारतो हे सांगणे कठीण आहे. स्थानिक नेत्यांपुढे पेच निर्माण झाल्यास अडीच-अडीच वर्ष उपसरपंच पद बहाल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती, 12 वर्षे ग्रामपंचायत सदस्याची अनुभव असलेले विठ्ठलराव गायकवाड ऐनवेळी राजकीय खेळी करून उपसरपंच पद खेचून घेऊन शकतात, याकडे देखील पाहिले जात आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Raghunath Patil : गरज नसतानाही सुधारित कायदा का करता? रघुनाथदादा सरकारवर कडाडले

तसेच 12 जणांच्या ग्रामपंचायतीमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने यात सहा महिला सदस्य पदावर निवडून आल्या आहेत. सरपंच पद महिलाला असल्याने व सदस्यातील गटबाजी रोखण्यासाठी उपसरपंच पदाची माळ महिला सदस्याच्या गळ्यात पडू शकते.

(Edited By Deepak Kulkarni)

Radhakrishna Vikhe Patil
Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : बंडखोरांनंतर आता फडणवीसांचा नंबर; नागपुरात धडाडणार पवारांची तोफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com