Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : सतेज पाटलांची निवडणूक स्ट्रॅटेजी विरोधकांना करणार घायाळ; सोशल मीडिया ठरणार ब्रह्मास्त्र

Rahul Gadkar

Kolhapur News : देशातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली सोशल मीडियावरील कमांड बळकट करण्याकडे लक्ष दिले आहे. ज्यांच्या हातात सोशल मीडियाची पॉवर आहे, त्यांच्याकडे तरुण आणि मध्यमवर्गीय मतदार आकर्षित होताना दिसत आहे. त्यातच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने सोशल मीडियावरील वावर वाढवला आहे. माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना सोशल मीडियात आपली ताकद बनू शकते, असे सांगत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. (Satej Patil's strategy to hurt the opposition in LokSabha)

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पाच वर्षांपूर्वीच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या प्रत्येक मेळाव्याची माहिती, भाषणे विरोधकांच्याही आरोप-प्रत्यारोपांच्या प्रत्येक फायली स्टोअर करीत सोशल मीडियावर वेगळा ट्रेंड सुरू केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील हे येणाऱ्या निवडणुका ह्या फेसबुक आणि यू-ट्यूबवर लढवल्या जातील, असा दावा करीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची आदेश दिले आहे. स्वतःसाठी एक वरून तयार करून विरोधकांना घायाळ करण्याची रणनीती आखली जात आहे.

आमदार सतेज पाटील यांनी स्वतःच्या पेजसह पक्षाचीही बांधणी सोशल मीडियावर अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही सुरू केले आहे. स्वतःचे satej d. Patil या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टू पेजवरून कार्यक्रमाचे लाईव्ह, दौऱ्याची माहिती दिली जाते. त्यामुळे मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांपर्यंत एका क्षणात मेसेज पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी satej_4maharashtra, satejpatil fans या पेजवरून विरोधकांनी दिलेल्या आश्वासनांची चिरफाड करीत ट्रोलिंग सुरू केले आहे. त्याचा मतदारांवर चांगलाच प्रभाव पडताना दिसत आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समाजमाध्यम हे प्रभावी अस्त्र असू शकते. जनमानसावर त्याचा मोठा प्रभाव पडतो, हे ओळखून आम्ही कार्यकर्त्यांना सोशल मीडिया वापराबाबत सूचना केल्या आहेत, अशी माहिती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली.

Edited By : Vijay Dudhale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT