Solapur, 27 July : खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात काँग्रेस भवनात केलेल्या वक्तव्यावरून सोलापूर काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. पक्षाचे सोलापूर शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळ यांनी मारण्याचा इशारा दिल्यानंतर आज शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही नेत्यांच्या विरोधात कोणी बोलणार असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशरा दिला आहे.
दरम्यान, काँग्रेस भवनातील त्या मेळाव्याला उपस्थित असलेले काँग्रेसचे (Congress) सातलिंग शटगार यांनी खुलासा केला आहे. मेळाव्यातील त्या भाषणाचा आणि माझा काहीही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले. त्यांचा तो खुलासा पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे शहराध्यक्ष नरोटे यांनी नमूद केले.
चेतन नरोटे म्हणाले, काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातील एक शिष्टमंडळ ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना ‘जनवात्सल्य’वर येऊन भेटले. त्यांनी शिष्टमंडळाच्या भावना ऐकून घेतल्या. त्यानंतर काही लोकांनी काँग्रेस भवनात जाऊन भाषणबाजी आणि स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकरणी काँग्रेसचे सोलापूर शहर वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांनी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार आणि सातलिंग शटगार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण, शटगार यांनी याबाबत खुलासा केला आहे.
‘एनएसयूआय’च्या विद्यार्थ्याने खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहे. ते आम्ही सर्वांनी बघितले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. अशा लोकांना आम्ही खतपाणी घालणार नाही. माझं स्पष्ट मत असं आहे की, सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी काँग्रेस भवनमध्ये येऊ नये. काँग्रेस पक्षाची धोरणे सगळ्यांनाच लागू होतात. जो निर्णय सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि पक्षश्रेष्ठी घेतील, तो आम्हाला सर्वांना मान्य राहील, असेही नरोटे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस भवनात कोणी चुकीचे बोलत असेल तर सरळ तुम्ही घरी बसा. पक्षाचे काम करण्यास अनेक लोक तयार आहेत. अनेक लोक करतील. पण नेत्यांबद्दल बोलताना भान ठेवून बोलावे, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराटे यांनी केले.
त्या बैठकीला उपस्थित असलेले सातलिंग शटगार यांनी त्याबाबत खुलासा केला आहे. त्या भाषणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. त्यांचा तो खुलासा आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पोचवेन, असे सांगून नरोटे म्हणाले, सोलापूर शहर आणि ग्रामीण काँग्रेस यांनी एकत्र येऊन काम करायचं आहे. तुम्हाला जे काही बोलायचे आहे, ते तुम्ही सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना वैयक्तिक भेटून सांगा. पण काँग्रेस भवनात येऊन बोलत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, असा खणखणीत इशाराही त्यांनी संबंधितांना दिला.
सुनील रसाळ यांनी तर संबंधित लोकांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला होता. रसाळ याचं काय चुकीचं आहे. ज्या पक्षाच्या आणि नेत्यांच्या जीवावर मोठे होता, त्यांच्याबद्दल असं कोणी बोलणार असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यापुढे असं कोणी वागणार असेल तर त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नरोटे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.