Satej Patil : "आता फसवायचा प्रयत्न केलात तर तुमच्याच भागात मुक्काम!"; सतेज पाटलांनी काँग्रेस सोडणाऱ्यांना ठणकावलं

Satej Patil Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मोर्चे बांधणीला वेग आला आहे. तर अनेक नेते महाविकास आघाडीतून महायुतीत जाताना दिसत आहेत.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला की शेवटच्या क्षणी पक्ष सोडणाऱ्यांना तोडून टाकले जाईल.

  2. "कोणी शेवटच्या १० दिवसात फसवणूक केली तर त्या प्रभागात मीच मुक्काम करीन आणि त्याचा 'करेक्ट कार्यक्रम' करीन," असा ठणकावून इशारा त्यांनी दिला.

  3. या इशाऱ्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली आणि पक्षफिरूंवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Kolhapur News : अनेकजण पदासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. मला त्याचं वाईट वाटत नाही. माणसं येतात आणि जातात, पण माणसं तयार करणारी फॅक्टरी हा बंटी पाटील आहे. त्यामुळे मला काही फरक पडणार नाही. ज्यांना मोठं केलं ते जातात हा अनुभव मला अनेकदा आला आहे. तुम्ही एकनिष्ठ म्हणून काँग्रेसच्या मेळाव्याला आला आहात. ज्यांना निर्णय घ्यायचा होता त्यांनी घेतलेला आहे. ज्यांना निर्णय घ्यायचा त्यांनी घ्यावा.

पण निवडणूक लागल्यानंतर मला शेवटच्या दिवसात कोणी फसवायचा प्रयत्न केला तर तो माझ्या टारगेटवर असेल हे लक्षात ठेवा. शेवटच्या दहा दिवसात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचं आणि त्यानंतर कोणी वेगळा निर्णय घेतला तर मग त्याच्या प्रभागात माझा मुक्काम असणार. त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा शब्दात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात पक्ष सोडणाऱ्यांना इशारा दिला आहे. (Satej Patil warns party workers not to betray Congress in last 10 days of local elections or face action in their own ward)

शहरातील प्रभागनिहाय विकासाची संकल्पना राबवण्यासाठी होऊ घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत ‘मिशन कोल्हापूर, मिशन महानगरपालिका आणि मिशन काँग्रेस महापौर’ हा अजेंडा सक्षमपणे राबवला जाईल, असा निर्धार करत कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसच्या निष्ठावंतांनी एकसंघ राहूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केला. याला उपस्थित काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमतांनी सहमती दर्शवली.

Satej Patil
Satej Patil : सतेज पाटील यांच्या लाल दिव्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या हाती; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी हालचालींना वेग

आमदार सतेज पाटील म्हणाले, शहरात राजरोस मिळणाऱ्या गांजा, अमली पदार्थांविरोधात काँग्रेस म्हणून ठोस भूमिका घेतली जाणार आहे. शहराच्या विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व तयार केले जाईल. महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांप्रमाणे आता ठेकेदाराही आत्महत्या करत आहेत. कंत्राटदारांनी नवीन काम घेताना विचार केला पाहिजे. सरकारकडेच पैसे नसल्याने घेतलेल्या कामांचे तीन वर्ष पैसे मिळणार नाहीत.

खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, काँग्रेस मेळाव्या निर्धार केल्याप्रमाणे आपण सर्वांनी एकसंघपणे ही निवडणूक लढायची आहे. लोकांना विकासाभिमुख लोकप्रतिनिधी द्यायचे आहेत. यासाठी प्रत्येक प्रभागात जावून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. माजी आमदार ऋुतूराज पाटील म्हणाले, महायुती सरकारने लोकांना आश्वासने देण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. चुकीच्या पध्दतीने कारभार करुन लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. यावेळी, आमदार जयंत आसगावकर, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर महादेव आडगुळे, मारुतराव कातवरे, भीमराव पोवार, शोभा बोंद्रे, जयश्री सोनावणे, वंदना बुचडे, संध्या घोटणे, सरलाताई पाटील यांच्यासह ८७ माजी उपमहापौर व माजी नगरसेवक उपस्थित होते.

श्रीपतराव बोंद्रे अन् पी. एन. पाटील

श्रीपतराव बोंद्रे, माजी आमदार पी.एन.पाटील यांनी काँग्रेसच्या विचारासोबत तडजोड केली नाही. त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेसचा विचारा पोचवला. आज त्यांचा विचार आपण पुढे घेवून जावूया, असेही आवाहन पाटील यांनी केले.

प्रभागनिहाय जाहीरनामा

महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह प्रत्येक वॉर्डनिहाय जाहीरनामा प्रसिध्द केला जाईल. यासाठी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्येक वॉर्डमधील घरा-घरा-घरात जावून लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. लोकांना त्यांच्या प्रभागात आवश्‍यक असणाऱ्या सोयी-सुविधांबाबत मते जाणून घ्यावीत. त्या-त्या प्रभागातील लोकांनी दिलेल्या सुचनेनूसार कोणत्या सुविधा दिल्या जातील, यासाठी प्रभागनिहाय जाहीरनामा प्रसिध्द केला जाईल, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

Satej Patil
Satej Patil: गोकुळमध्ये पैशांचा वापर कोणी केला? सतेज पाटलांनी हिस्ट्रीच काढली; शिवाजी पाटील, राजेश क्षीरसागरांच्या डोक्यावर 'बंदूक'

पडणारे प्रश्न :

1. सतेज पाटील यांनी कोणता इशारा दिला?
– शेवटच्या क्षणी काँग्रेस सोडणाऱ्यांवर त्यांच्या प्रभागात जाऊन कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

2. कोणत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा दिला गेला?
– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला.

3. 'करेक्ट कार्यक्रम' याचा अर्थ काय?
– हा एक राजकीय इशारा असून, फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात निवडणूक रचनेचा भाग म्हणून थेट कारवाई केली जाईल.

4. काँग्रेस कार्यकर्त्यांचे यावर काय मत आहे?
– अनेक कार्यकर्त्यांनी सतेज पाटलांची भूमिका स्वागतार्ह असल्याचे सांगितले असून, एकजूट ठेवण्याचे आवाहन मानले आहे.

5. हा इशारा कोणत्या ठिकाणी दिला गेला?
– हा इशारा काँग्रेसच्या आयोजित निवडणूक मेळाव्यात दिला गेला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com