satyajeet patankar-shambhuraj desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : पाटणमध्ये सातारा ZPची पुनरावृत्ती : बहुमत असूनही पाटणकरांचा शंभूराज देसाईंना दे धक्का!

Satara District Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी निवडे सोसायटीतील ठराव सत्यजितसिंह पाटणकर गटाच्या बाजूने झाल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Patan, 01 August (सूर्यकांत पाटणकर) : (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटींचे ठराव पोलिस बंदोबस्त होत असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची पुनरावृत्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण पाटण तालुक्यातील निवडे सोसायटीचा ठराव पोलिस बंदोबस्तात झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, निवडे सोसायटीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आठ संचालकांसह बहुमत असतानाही दोन संचालक फुटल्याने सत्यजितसिंह पाटणकर गटाच्या बाजूने ठराव झाला आहे, त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक सुरू होण्यापूर्वीच शंभूराज देसाई यांना मोठा धक्का बसला आहे.

(स्व.) आबासाहेब वीर, यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील, सदाशिव पोळ यांनी राजकीय जोडे सहकाराच्या मंदिराबाहेर ठेवून सातारा जिल्हा बँकेचा नाव लौकिक देशभर पसरवला.

नाबार्डचे अनेक पुरस्कार जिल्हा बँकेला मिळाले. जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून सातारा जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. मात्र, याच सातारा जिल्हा बँकेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांचे ठराव पोलिस बंदोबस्त होत असल्याने सहकारातील जुन्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

निवडे येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीच्या ठरावासाठी संचालकांना गायब करून ठरावाच्या सभेसाठी पोलिस बंदोबस्तात आणले गेले. सत्ताधाऱ्यांकडून साम-दाम-दंड भेदाचा वापर केला जात आहे, असा आरोप देसाई गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

निवडे सोसायटी ही ग्रुप सोसायटी असून या सोसायटीमध्ये पाटणकर गटाचे ४, तर मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाचे ८ सदस्य असे बलाबल होते. सोसायटीच्या ठरावाच्या अगोदर पाटणकर गटाने देसाई गटाचे दोन सदस्य गळाला लावून सहा मतांची बेरीज केली, तर देसाई गटाकडे सहा सदस्य संख्या उरली. प्रत्यक्ष मतदानावेळी दोन्ही बाजूने ६ मते मिळाल्याने अध्यक्षांचे मत निर्णायक ठरले.

सोसायटीच्या अध्यक्षाने पाटणकर गटाच्या बाजून मतदान केल्याने निवडे सोसायटीचा ठराव पाटणकर गटाच्या बाजूने झाला आहे. मात्र या ठरावावेळी सोसायटीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पाेलिस बंदोबस्तात सोसायट्यांचे ठराव होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

जिल्ह्यातील व राज्यातील सत्ताधारी मंडळींनी सातारा जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा रोवण्याचा चंग बांधला आहे. भाजपे जिल्हा परिषद, बहुतांश पंचायत समित्या आणि नगरपालिकांमध्ये यश मिळविल्यानंतर भाजपचे उद्दिष्ट जिल्हा बँक हेच आहे, त्यामुळे मतांच्या ठरावादरम्यान सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये पाटणमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT