Satyajeet Tambe : Balasaheb Thorath
Satyajeet Tambe : Balasaheb Thorath Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satyajeet Tambe : मला आणि बाळासाहेब थोरातांना पक्षातून हकलण्याचं षडयंत्र :तांबेंचा घणाघाती आरोप!

सरकारनामा ब्यूरो

Satyajeet Tambe : नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीतील सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आज (ता. ४) आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्रे दाखवून, काँग्रेस पक्षावर टीका केली. हेतूपरस्परपणे आमची बदनामी केली, असा आरोप तांबे यांनी केला.

या निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नेते व सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या मौनावर अनेक प्रश्न निर्माण होत होते. यावरही सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर आरोप करत, त्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक त्यांचा या सर्व घडामोडींशी तसा काही संबंध नव्हता. परंतु थोरातांना बदनाम करण्याचा यांचा डाव होता, मला आणि बाळासाहेब थोरातांना पक्षातून हकलण्याचा षडयंत्र होता, आरोप असा आरोप त्यांनी केला.

संघटना आणि पक्ष मला संधी देऊ शकत नाही. त्यामुळे वडिलांनी सांगितले की, ही निवडणूक तू लढवली पाहिजे. घरामध्ये चर्चा केली. त्या चर्चेमध्ये थोरात साहेब होते. त्यावेळी ठरले की सत्यजीत यांनी लढावे. मात्र, त्यावेळी माझी मानसिक तयारी नव्हती. त्याप्रमाणे आम्ही पक्षाच्या नेत्यांना सगळे सांगितले होते की, आम्ही वेळेवर निर्णय घेऊ, यावर एच. के. पाटील यांनी सांगितले की, दोघांपैकी कोणाला लढायचे याचा निर्णय घ्या, असे तांबे म्हणाले.

"माझा माणूस १० जानेवारीला सकाळपासून बसून राहिला. दोन एबी फॉर्म घेऊन आमचा माणूस घेऊन आला. फॉर्म भरायला सुरुवात केली. एबी फॉम बघितल्यावर कळाले की, हे फॉर्म आमचे नव्हते. त्यामध्ये एक औरंगाबादचा आणि एक नागपूरचा एबी फॉर्म होता, असे धक्कादायक सत्य सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT