Satyajeet Tambe, Radhakrishna Vikhe Patil
Satyajeet Tambe, Radhakrishna Vikhe Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satyajit Tambe : भाजपच्या मदतीमुळेच तांबेचा विजय; त्यांनी निर्णय घ्यावा : विखे-पाटील

सरकारनामा ब्युरो

Karad News : सत्यजीत तांबे Satyajeet Tambe यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली त्यामुळे त्यांचा विजय झाला. आता त्यांनी भाजपमध्ये BJP जाण्याचाच निर्णय घेतला पाहिजे, असे ठाम मत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील Radhakrishna Vikhe Patil यांनी व्यक्त केले.

नाशिक पदवीधरची निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यापासून राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिली. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर विखें-पाटील यांच्या व्यतिरिक्त पकड बसविणाऱ्या थोरात-तांबे घराण्याशी संबंधित हे प्रकरण होते. सलग तीनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसने एबी अर्ज दिलेला असतानाही ऐनवेळी माघार घेऊन पुत्र सत्यजित तांबे यांना अपक्ष रिंगणात उतरविले.

डॉ. तांबे यांना मुलालाच उमेदवार म्हणून पुढे करायचे होते तर, त्यांनी काँग्रेसचा पर्याय का निवडला नाही, हा प्रश्न चर्चेत आला. त्यामुळेच या सर्व घडामोडींमागे भाजपचे डावपेच असल्याची चर्चा रंगली. भाजपनेही उमेदवार उभा न करण्याचा चाणाक्षपणा दाखवित डावपेच अधिकच गहिरे केले. तांबे यांना शेवटपर्यंत अधिकृतपणे पाठिंबा जाहीर करण्याचे टाळणाऱ्या भाजपने स्थानिक पातळीवर कार्यकर्तेच काय ते ठरवतील, अशी भूमिका घेऊन नेमकं काय शिजत आहे, हे दाखवून दिले.

त्याचा संदर्भ देत मंत्री विखे -पाटील यांनी कऱ्हाडमध्ये तांबे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य केले.कृष्णा विद्यापिठाच्या दिक्षांत समारंभासाठी ते कऱ्हाड दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कृष्णा बॅंकेचे अध्यक्ष अतुल भोसले उपस्थित होते. ते म्हणाले, सत्यजीत तांबे यांच्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली, त्यामुळे त्यांचा विजय झाला. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले आहेत. त्यामुळे त्यांच्या आभारतच त्यांचे उत्तर दडलेले आहे, असे सांगुन त्यांनी अधिक बोलणे टाळले.

अतुल भोसलेंना ताकद देवु

भाजपचे अतुल भोसले हे सक्षम नेते आहेत, असे सांगुन महसुलमंत्री विखे-पाटील म्हणाले, त्यांनी कऱ्हाडमधुन नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी जे-जे करायचे आवश्यक आहे ते त्यांनी करावे. त्यासाठी त्यांना आम्ही पाठबळ देवु, अशी स्पष्टोक्तीही महसुल मंत्री विखे-पाटील यांनी केली.

SCROLL FOR NEXT