Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात खिंड सोडुन पळुन गेले : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat: राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज कराडात माध्यमाशी संवाद साधला.
Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat sarkarnama
Published on
Updated on

Karad News : मी भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर बाजीप्रभु देशपांडे यांच्यासारखा मी एकटा खिंड लढवणार आहे, अशी भिमगर्जना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली होती. त्यांनी आता खिंड सोडुन पळ काढला आहे, अशी उपरोधिक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थोरातांवर केली आहे.

नाशिक पदवीधर निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज कराडात माध्यमाशी संवाद साधला. यावेळी कृष्णा बॅंकेचे अध्यक्ष अतुल भोसले यावेळी उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले, तुम्ही देशातील अध्यक्षांकडे जाऊन भांडा किंवा महाराष्ट्राचे जे प्रभारी असतील त्यांच्याकडे जाऊन भांडा. परंतु पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झालेला आहे. त्याची जबाबदारी ते घेणार की नाही, हा प्रश्न महत्वाचा आहे.

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat
Thorat Vs Vikhe Patil : थोरातांनी नाशिकमधील महाआघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी घ्यायला हवी होती : विखे पाटलांनी वादात काडी टाकली

नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण, काँग्रेसने महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat
Satara : चार पाच डाकूंकडूनच उद्धव ठाकरेंना चुकीचे फिडींग : गुलाबराव पाटील यांची टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com