Karad : तांबेंच्या विजयाचा युवक काँग्रेसला आनंद; कराडात झळकले अभिनंदनाचे बॅनर

Satyajit Tambe सत्यजित तांबेंच्या विजयाने कराड युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आनंद झाला आहे.
Satyajit Tambes Banners
Satyajit Tambes BannersSarkarnama
Published on
Updated on

Karad News : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे Satyajit Tambe यांनी विजयश्री खेचून आणत तांबे कुटुंबाचे राजकारणातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. दरम्यान, युवक काँग्रेसच्या Youth Congress युवकांनी तांबेंनाच आपला पाठिंबा दिला असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कराड शहरात तांबे यांच्या विजयाचे बॅनर येथील युवक कॉँग्रेसच्याच युवकांनी लावले आहेत. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

काँग्रेस विचारांच्या जडणघडणीत वाढलेल्या सत्यजित तांबे यांचा राजकीय प्रवास २२ वर्षांचा असला, तरी एखाद्या मुरब्बी राजकीय नेत्याप्रमाणे त्यांची वाटचाल आहे. कुठे किती बोलायचे. कुठे संयम दाखवायचा याचे धडे त्यांना वडील सुधीर तांबे आणि मामा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून मिळाले आहेत. म्हणूनच त्यांच्या बंडखोरीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते.

६८ हजार ९९९ मते मिळवणारे सत्यजित तांबे २९ हजार ४६५ मताधिक्याने विजयी झाले. शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा त्यांनी पराभव केला. तांबे यांच्या विजयात भाजपचा हातभार असला, तरीही जाहीरपणे पाठिंबा देता आला नाही ते कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Satyajit Tambes Banners
Nashik Graduate Election: या 'चार' कारणांमुळे सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय...!

या निवडणुकीच्या मैदानापासून दूर मुंबईत उपचार घेणारे बाळासाहेब थोरात हेही या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. काँग्रेसच्या ज्या नेत्यांना बाळासाहेब स्पर्धक वाटतात त्यांनी बाळासाहेबांना लक्ष करण्‍याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. काँग्रेसमधून भाजपत आलेले आणि आपले चांगले बस्तान बसवणारे राधाकृष्ण विखे- पाटील यांनी तांबेंना पाठिंबा तर दिला, मात्र बाळासाहेब थोरात यांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही.

Satyajit Tambes Banners
Prithviraj Chavan News : बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या डोक्यावरचे कर्ज ४५ टक्क्यांनी वाढणार..

तांबे यांची पुढची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट नाही. आधी निलंबन केले आणि आता विजय झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षात सन्मानाने घेण्याचा निर्णय घेतला तरी सत्यजित जाणार का? सत्यजित काँग्रेसमध्ये गेले, तर त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या भाजपची भूमिका काय राहणार हा पेच कायम आहे. दरम्यान, राज्यातील युवक काँग्रेसच्या युवकांनी सत्यजित तांबेंनाच आपला पाठिंबा दिला असल्याचे सध्या दिसत आहे.

Satyajit Tambes Banners
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंचे पत्रकार परिषदेत थेट कागदपत्र दाखवत धक्कादायक आरोप

त्यातूनच कराड शहरात तांबे यांच्या विजयाचे बॅनर मोठ्या प्रमाणावर झळकू लागले आहेत. शहरातील चौकात सत्यजित तांबे मित्र परिवाराकडून अभिनंदनाचे फलक झळकविण्यात आले आहेत. ढेबेवाडी फाटा येथे युवक काँग्रेसच्या अभिजित पाटील व राहुलराज पवार यांनी अभिनंदनाचे फलक लावले आहेत. त्यामुळे तांबेंच्या विजयाचे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आनंद झाला आहे.

Satyajit Tambes Banners
Karad Palika : पाणीपट्टीवरून कराडला काँग्रेसमध्ये दुफळी; ज्येष्ठांचा सवतासुभा

युवकांचे नेतृत्व आमदार झाल्याचा आनंद

सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला राजकारणाचा व्यासपीठ मिळवून देणारे नेतृत्व आमदार झाले याचा आनंद आहे, असे सांगून कऱ्हाड दक्षिण युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस अभिजित पवार म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे आम्ही सत्यजित तांबे यांच्यासोबत काम करतोय. सन २०११ मध्‍ये आमच्या चचेगावला आमचे नेते युवक कॉँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी भेट घडवून दिली. सत्यजित तांबे हे आगामी काळात ते युवकांच्या व पदवीधरांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतील. शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात आम्ही सत्यजित तांबे यांच्यासोबत काम करू.’’

Satyajit Tambes Banners
Karad : काश्मीरमध्ये कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना मिठ्या मारणे हा बाळासाहेबांचा अपमानच... दीपक केसरकर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com