Shivaji Sawant-Anil Sawant-Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politic's : माढ्यात उलटफेर, 'काकांच्या भूमिकेशी संपूर्ण सावंत परिवार सहमत नाही'; अनिल सावंतांनी भूमिका केली स्पष्ट

Sawant Family's Decision : सावंत परिवाराचे मानेगावपासून मोडनिंब, टेंभुर्णीपर्यंतचे सर्व आप्तस्वकीय उपस्थित आहेत. सावंत परिवारातील नव्या पिढीचे ज्येष्ठ सुपुत्र अनिल सावंत हे स्वतः उमेदवार आहेत. अनिल सावंत यांचे बंधू आणि परिवारातील सर्व सदस्य माढ्यात अभिजीत पाटलांचा प्रचार करीत आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 15 November : माढ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलटफेर झाला असून सावंत परिवरातील मतभेदही यानिमित्ताने पुढे आले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी माढ्यातील अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, दोनच दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे उमेदवार अनिल सावंत यांनी ‘आमचे काका शिवाजी सावंत यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही, त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. संपूर्ण सावंत परिवार माढ्याचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा प्रचार करत आहेत’ असे सांगितले.

शिवाजी सावंत यांच्या भूमिकेनंतर संपूर्ण सावंत परिवाराने एकत्र पत्रकार परिषद घेऊन माढ्यातील सावंत परिवाराची भूमिका स्पष्ट केली. अनिल सावंत (Anil Sawant) म्हणाले, आमचे काका शिवाजी सावंत यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही, त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही.

आमच्यासह संपूर्ण सावंत परिवार आणि आमचे नातेवाईक, मित्र आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांचा प्रचार करत आहोत. विरोधक अफवा पसरवून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

अभिजीत पाटील यांचे पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील सर्व कार्यकर्ते माझे काम करीत आहेत. आम्ही दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहोत. आमच्या दोघांच्या डोक्यात काहीही नसताना विरोधक आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तो गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये, यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट करत आहोत.

आम्ही दोघंही चांगल्या मतांनी निवडून येणार आहोत. सावंत कुटुंबीय हे अभिजीत पाटील यांचे काम करत नाही, अशी अफवा पसरवली गेली आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी आपण सावंत परिवाराचा भाचा असल्याचे सांगून माढ्यात सावंत परिवाराचा अभिजीत पाटील यांना सक्रिय पाठिंबा आहे. सावंत परिवाराचे मानेगावपासून मोडनिंब, टेंभुर्णीपर्यंतचे सर्व आप्तस्वकीय उपस्थित आहेत.

सावंत परिवारातील नव्या पिढीचे ज्येष्ठ सुपुत्र अनिल सावंत हे स्वतः उमेदवार आहेत. अनिल सावंत यांचे बंधू आणि परिवारातील सर्व सदस्य माढ्यात अभिजीत पाटलांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे मनात कुठलाही संभ्रम ठेवू नये, असे स्पष्ट केले.

सावंत परिवारातील काही सदस्यांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, ही संपूर्ण सावंत परिवाराची भूमिका नाही. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, संपूर्ण सावंत परिवार त्या मताशा सहमत आहे, असे नाही.

शिवाजी सावंतांनी घेतलेली भूमिका ही व्यक्तिगत असून ती पक्षीय किंवा सावंत कुटुंबीयांची नाही. सावंत परिवार मोठा असून एका व्यक्तीची भूमिका ही संपूर्ण कुटुंबाची भूमिका होऊ शकत नाही, असेही कोकाटे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT