Pandharpur Politic's : पंढरपुरात महाविकास आघाडीत कुस्ती; अनिल सावंत-भगीरथ भालकेंचे अर्ज कायम....

Assembly Election 2024 : काँग्रेसचे भगीरथ भालके तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल सावंत या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले आहेत.
Bhagirath Bhalke-Anil Sawant-Samadhan Autade-Dilip Dhotre
Bhagirath Bhalke-Anil Sawant-Samadhan Autade-Dilip Dhotre
Published on
Updated on

Pandharpur, 04 November : पंढरपुरात महाविकास आघाडी बिघाडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत आणि काँग्रेसचे भगीरथ भालके या दोघांचेही उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीतील फाटाफूट महायुतीच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

पंढरपूरमधून महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तसेच, महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी माघार घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पंढरपुरात आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. राज ठाकरे यांनी पंढरपुरात (Pandharpur) निष्ठावंत दिलीप धोत्रे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे पंढरपुरात चौरंगी लढत होणार आहे. मतविभागणीचा फायदा आपोआप भाजपच्या उमेदवाराला होऊ शकतो.

Bhagirath Bhalke-Anil Sawant-Samadhan Autade-Dilip Dhotre
Mahavikas Aghadi : जयंत पाटलांनी शेकापला रायगडमधील तीन जागा मिळविल्या; पण सांगोल्याच्या देशमुखांचे काय?

काँग्रेसचे भगीरथ भालके तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल सावंत या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले, त्यामुळे पंढरपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात मैत्रीपूर्ण लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Bhagirath Bhalke-Anil Sawant-Samadhan Autade-Dilip Dhotre
Ramesh Kadam : मोहोळमधून रमेश कदम, सिद्धी कदम यांची माघार; पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा

भाजपचे आमदार समाधान आवताडे, मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत, काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके अशा प्रमुख उमेदवारांमध्ये पंढरपुरात चौरंगी लढत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com