shivendra raje bhosale-udayanraje bhosale-shashikant shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Nagar Parishad : उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या आक्रमक डावपेचापुढे शशिकांत शिंंदेंसह काँग्रेस-सेना नेत्यांची रणनीती फेल!

Udayanraje-Shivendraraje Strategy : सातारा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने जागावाटप अंतिम केले असून उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटांना २२-२२ जागा देण्यात आल्या. नगराध्यक्षपदासाठी अमोल मोहिते यांची निवड झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो
  1. सातारा नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तडजोड करून ५० पैकी २२-२२ जागांचे वाटप केले असून नगराध्यक्षपदासाठी अमोल मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  2. महाविकास आघाडीला अपेक्षित उमेदवार न मिळाल्याने त्यांना ५० पैकी सर्व जागांवर उमेदवार देता आले नाहीत, तसेच नगराध्यक्षपदासाठी भाजपमधील बंडखोर सुवर्णा पाटील यांच्यावरच अवलंबून राहावे लागले.

  3. महाविकास आघाडीला १० प्रभागांत एकही उमेदवार मिळालेला नसल्याने, सध्याच्या स्थितीत तरी भाजपचे दोन्ही राजे गट प्रबळ स्थितीत आहेत.

Satara, 18 November : सातारा नगरपरिषदेच्या जागा वाटपासाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. त्याला अखेरी मूर्त रूप मिळाले. दोन्ही नेत्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५० जागांपैकी मूळ भाजपला ६ जागा देत दोन्ही गटांनी २२-२२ जागा वाटून घेतल्या आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांना संधी देण्यात आली आहे.

त्याचवेळी सातारा (Satara) नगरपरिषदेत महाविकास आघाडीचे पॅनेल दोन्ही राजेंच्या पॅनेलपुढे आव्हान उभे करेल असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. दोन्ही राजेंकडून नाराज होणाऱ्यांवर प्रामुख्याने महाविकास आघाडीची नजर होती. हे नाराज सहज मिळतील, असे वाटत होते; पण प्रत्यक्षात उलट परिस्थिती झाली. महाविकास आघाडीची उमेदवार शोधताना दमछाक झाली. महाविकास आघाडीला पूर्ण ५० उमेदवारांचे पॅनेल उभे करण्यासाठी उमेदवार मिळाले नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP SP) केवळ ७ प्रभागात २ आणि ७ प्रभागांमध्ये प्रत्येकी १ असे २१ उमेदवार देता आले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ८ आणि काँग्रेसला १६ जागांवर उमेदवार मिळाले. थोडक्यात महाविकास आघाडीला सर्व ५० जागांवरही उमेदवार देता आलेले नाहीत.

नगराध्यक्षपदासाठीही त्यांनी भाजपतून बंडखोरी केलेल्या सुवर्णा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत तरी महाविकास आघाडीचे दोन्ही राजे गट आणि भाजपपुढे आव्हान दिसत नाही.

अर्ज दाखल केलेले प्रभागनिहाय उमेदवार असे : नगराध्यक्ष : सुवर्णादेवी पाटील, प्रभाग २ : दयानंद नागटिळक, लक्ष्मी राठोड, प्रभाग तीन : रितेश लाड, प्रभाग चार : विकास धुमाळ, प्रभाग पाच : सोनम काळेकर, प्रभाग सात : रजिया शेख, महेश गोंदकर, प्रभाग आठ : पूजा बनसोडे, चंदन जाधव, प्रभाग अकरा : सचिन बागल, प्रभाग १२ : मीना गोंदकर, प्रभाग १४ : सीमा पवार, प्रभाग १५ : ऋषिकेश गायकवाड, आयेशा शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर प्रभाग १७ : विजय बोबडे, उषा जाधव, प्रभाग १८ : डॉ. नीता यादव, अमोल खुडे, प्रभाग १९ : अनिकेत साळुंखे, प्रभाग २४ : जितेंद्र बडेकर, प्रभाग २५ : शुभांगी निकम यांना तिकीट देण्यात आले आहे. तर प्रभाग - १, ६, ९, १०, १३, १६, २०, २१, २२, २३ या दहा प्रभागांत महाविकास आघाडीच्या पॅनेलला एकही उमेदवार मिळालेला नाही. यातही आता उमेदवारी अर्ज मागे घेताना किती उमेदवार राहणार याची उत्सुकता आहे.

1. भाजपने सातारा नगरपरिषदेत जागा कशा वाटून घेतल्या?

– उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी ५० पैकी २२-२२ जागांचे वाटप केले.

2. नगराध्यक्ष पदासाठी भाजपने कोणाला उमेदवारी दिली?

– माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली.

3. महाविकास आघाडीला सर्व ५० जागांवर उमेदवार देणे जमले काय?

– नाही, त्यांना १० प्रभागांत एकही उमेदवार मिळू शकला नाही.

4. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार कोण आहेत?

– भाजपमधील बंडखोर सुवर्णा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT