ShahajiBapu Patil, Eknath shinde, Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ShahajiBapu Patil: 'भाजप आमदारांच्या रेट्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री, पण शिंदे हे...'; शहाजीबापूंचं खळबळजनक विधान

Mahayuti Political News : सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रि‍पदासह एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत केलेलं विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Deepak Kulkarni

Sangola Politics: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेना 81 पैकी तब्बल 57 जागा जिंकत महायुतीतला नंबरचा दोनचा पक्ष ठरला होता. भाजपनंतर राज्यात सर्वाधिक जागा या शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. मात्र,शिवसेनेतील बंडापासून शिंदेंना भक्कम साथ देणारे सांगोल्याचे 'काय झाडी,काय डोंगार,काय हाटेल'फेम शहाजीबापू पाटील यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.त्यानंतर आता शहाजीबापूंनी खळबळजनक विधान केलं आहे.

सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रि‍पदासह एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत केलेलं विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ते म्हणाले,भाजप आमदारांच्या रेट्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण एकनाथ शिंदे हे आता कोणत्या खुर्चीवर आहेत, याला इतिहासात काही महत्त्व राहिलेलं नाही. जनतेच्या मनावर राज्य करणारे ते लोकनेते असल्याचं कौतुकोद्गार शहाजीबापू यांनी काढले आहेत.

तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी एकनाथ शिंदेंकडू मला जी मोठी जबाबदारी देण्यात येईल,ती अतिशय चांगल्याप्रकारे निभावेल.आपल्या कामाच्या माध्यमातून शिंदेंनी दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं करेल, असंही माजी आमदार शहाजीबापू यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेनेतील एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली.त्यांनी 2022 बंडांचं निशाण फडकवत भाजपसोबत जात सत्तास्थापन केली होती.उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार शिंदेंच्या बंडामुळे कोसळलं.त्यानंतर सर्वांचाच अंदाज चुकवत महायुती सरकारमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार असूनही देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 132 जागा निवडून आणत महायुतीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. पण तरीही शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते.पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे शिंदे यांना अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. यावरच बापूंनी केलेलं विधान महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे विरोधकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. त्याचमुळे घराबाहेर पडून राजकारणात पुन्हा कसे यायचे यासाठी ईव्हीएमवरती आक्षेप हा शोधलेला मार्ग असल्याचा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

संजय राऊतांनी शिवसेनेचे तुकडे करून टाकले...

शहाजीबापूंनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या.ईव्हीएम मशीनवर घ्या. अजून काही कुठलं संशोधन असेल तर ते करा. पण संजय राऊत तुमचं काल घर भुईसपाट झालेलं आहे. त्यातील पत्रा, विटा काही चांगले असतील, तर गोळा करा आणि तुमचं झोपडं बांधा.पण राऊतांनीच शिवसेनेचे तुकडे करून टाकले. आता उरली सुरली ठाकरेंच्या शिवसेनेचे वाटोळं केल्याशिवाय तो काय आता गप्प बसत नाही, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

शहाजीबापू पाटील काय म्हणाले?

संजय राऊतांनी दिल्लीतील अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच खासदार अजित पवार यांनी फोडून आणल्यानंतर त्यांच्या पक्षाला केंद्रात मंत्रिपद मिळणार दिले जाणार अशी ऑफर भाजपने दिल्याचा दावा राऊत यांनी केला होता. त्यावर शहाजीबापू यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, संजय राऊत हा सकाळ- संध्याकाळ वेगवेगळी दिवा स्वप्नं पाहणारा माणूस आहे. जे स्वप्नं संध्याकाळी पाहतो ते सकाळी टीव्हीसमोर सांगण्याची सवय आहे.त्यामुळे अजित पवारांना भाजपकडून कोणतीही अट घालण्यात आले नसल्याचं बापूंनी अगदी ठणकावून सांगितलं.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर दोन मित्रांमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचे पाहायला मिळाले होते. सांगोल्यात शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांना 1 लाख 16 हजार 256, शहाजी बापू पाटील यांना 90 हजार 870, तसेच उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांना 50 हजार 962 मतं मिळाली.देशमुख यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 25 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT