NCP Politics : "कार्यकर्त्यांच्या भावना..." शरद पवार-अजितदादा एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य

Sunanda Pawar On Ajit Pawar And Sharad Pawar : सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत एक सूचक वक्तव्य सुनंदा पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वाक्यामुळे काका-पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
Sharad Pawar, Sunanda Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Sunanda Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sunanda Pawar Statement : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी (ता.12 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काका-पुतण्याच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

या भेटीच्या चर्चा सुरू असतानाच काल सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील शरद पवारांची भेट घेतल्याची बातमी समोर आली. त्यामुळे पडद्यामागे काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय अजितदादा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. "मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते, विखुरलेले राहू तर ताकद कमी होते", असं सूचक वक्तव्य सुनंदा पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वाक्यामुळे काका-पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.

Sharad Pawar, Sunanda Pawar, Ajit Pawar
Sanjay Raut : "पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत...; राऊतांनी भाजपला ललकारलं

सुनंदा पवार नेमकं काय म्हणाल्या?

माध्यमांशी बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, "मी कालच्या भेटीकडे कौटुंबिक भेट म्हणून पाहते. कारण काल शरद पवारांसाठी (Sharad Pawar) महत्वाचा दिवस होता, त्यांच्या 85 वा वाढदिवसानिमित्त सगळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीला गेले होते. ही भेट राजकीय होती का? हे मला सांगता येणार नाही. पण सध्या आमचं जे फुटलेलं कुटुंब आहे ते गेल्या कितीतरी पिढ्यांपासून एकत्र नांदत आहे.

सगळ्या सुखदुःखात आणि अडचणीत आम्ही एकत्र होतो. शिवाय जो-तो आपापल्या व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात वेगळं काम करत असले तरी शेवटी कुटुंब कुटुंब आहे, कुटुंबात मतभेद असतातच, मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्रही येऊ शकतात, असं त्या म्हणाल्या.

Sharad Pawar, Sunanda Pawar, Ajit Pawar
Nana Patole: मोठी बातमी! विधानसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का? पटोलेंचं थेट खर्गेंना पत्र

तर, सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही त्यांनी एकत्र यावं असं वाटतं. कार्यकर्त्यांच्या भावना बरोबर आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते, विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते, त्यामुळे एकत्र राहणे महत्वाचं आहे. अजितदादा आणि शरद पवारसाहेब विचार करूनच निर्णय घेतील याबाबत मला शंका वाटत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com