Eknath Shinde-ShahajiBapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil : 'मी निवडून आलो असतो तर शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, कारण...'; शहाजीबापूंचा 'सांगोला पॅटर्न'च वेगळा

Solapur Shivsena Politics : महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊच शकत नाही. पण याचवेळी त्यांनी मी सांगोल्यातून निवडून यायला हवं होतं, अशी खंतही व्यक्त केली. मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असंही त्यांनी म्हटलं.

Deepak Kulkarni

Solapur News : सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ दिली होती.पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.या पराभवाच्या धक्क्यातून सावरत शहाजीबापूंनी (ShahajiBapu Patil) पुन्हा सांगोल्यासह सोलापूरच्या राजकारणात लक्ष घातलं आहे. त्यातच त्यांनी शिवसेनेतील प्रमुख नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंतांनाच लक्ष्य केल्यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या मुख्मंत्रीपदाबद्दल मोठं विधान केलं आहे.

शहाजीबापू पाटील यांना जसं विधानसभेला सांगोल्यात पराभवाला सामोरे जावे लागले.तसेच महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येऊनही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्रीपदाची समाधान मानावे लागले. याच पार्श्वभूमीवर शहाजीबापूंनी अजब लॉजिक लावलं आहे.

शहाजी पाटील हे सोलापुरात बोलत होते. महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊच शकत नाही. पण याचवेळी त्यांनी मी सांगोल्यातून निवडून यायला हवं होतं, अशी खंतही व्यक्त केली. मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असंही त्यांनी म्हटलं.

पाटील म्हणाले,कारण मी 1995 ला निवडून आलो, तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आपण 2019 ला निवडून आलो, त्यावेळी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जर आपण निवडून आलो असतो,तर आताही एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री झाले असते. असं अजब-गजब लॉजिक शहाजीबापूंनी लावल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावेळी त्यांनी आपली रास शिवसेनेची असनही मी पूर्वी कसा काय काँग्रेसमध्ये गेलो होतो,हे माहिती नसल्याचंही सांगितलं.

शहाजीबापू म्हणाले,एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वासाठीच आपली लढाई आहे.तुम्ही आम्ही जसे मावळे आहोत, तसेच मावळे पानिपतला जाणारेही होते. एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही, असं राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक म्हणतात. पण गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट घेतले.

शिवसेनेचे माजी आमदार यावेळी सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांत पक्षाची सूत्र दुसऱ्यांकडे गेली, त्यामुळे पक्षाची पीछेहाट झाल्याचा हल्लाबोलही केला.तसेत ते म्हणाले, गंगेचा उगम पवित्र आहे,कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून आला. त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे, बाळासाहेब ठाकरेंपासून तिचा उगम आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना मागे पडल्याचा टोलाही त्यांंनी लगावला.

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे देखील तानाजी सावंत यांनी पाठ फिरवल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे.

पाटील म्हणाले, तानाजी सावंत हे मोठ्या शिक्षण संस्था चालवतात, पाच-सहा कारखाने सुद्धा झाले आहेत. काही कारखाने त्यांना आणखी खरेदी करायचे आहेत, अशा व्यापामध्ये ते गुंतल्याने त्यांचं पक्षकार्यातल कमी झाल्याचा चिमटाही शहाजीबापू पाटलांनी काढला. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT