Omraje vs Rana Patil : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांसमोरच राजकीय भडका; ओमराजे अन् राणा पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी

Dharashiv political clash News: जिल्हा नियोजन समितीच्या कामाना दिलेली स्थगिती अन तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणावरून गुरुवारी पार पडलेल्या डीपीडीसी बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोरच राडा झाला.
Pratap sarnaik, omrajenimbalkar, ranajagjitsinh patil
Pratap sarnaik, omrajenimbalkar, ranajagjitsinh patil Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्हा नियोजन समितीच्या कामाना दिलेली स्थगिती अन तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणावरून गुरुवारी पार पडलेल्या डीपीडीसी बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोरच राडा झाला. या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यातील वाद चांगलाच रंगला. त्यामुळे बैठकीतील वातावरण काही काळ चांगलेच तापले होते.

जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु होताच खासदार ओमराजे (om rajenimablakar) यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा नियोजन समितीच्या कामाना स्थगिती कोण दिली? असा सवाल करीत या मागे नेमका कोण आहे? ते सांगा असा सवाल करीत पालकमंत्र्यांना धारेवर धरले. तर त्याचवेळी आमदार राणा पाटील यांनी कामांना स्थगिती मुख्यमंत्री पातळीवर देण्यात आली आहे. ज्यांना उत्तर हवे, त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून स्थगितीचे कारण जाणून घ्यावे, असा टोला लगावला.

Pratap sarnaik, omrajenimbalkar, ranajagjitsinh patil
Devendra Fadnavis Announcement : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं गिफ्ट, आता मंत्रालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही...

ड्रग्ज प्रकरणावरून तुळजापुरची जाणून बुजून बदनामी केली जात आहे. हे प्रकरण मी उघडकीस आणले आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याची मीच मागणी केली असल्याचे राणा पाटील यांनी स्पष्ट केले तर ओमराजे निंबाळकर यांनी या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पत्रकार परिषद घेऊन माझा बाप काढतात, अशी तक्रार पालकमंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडे केली.

Pratap sarnaik, omrajenimbalkar, ranajagjitsinh patil
Beed BJP : बीड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सुरेश धसांच्या मतदारसंघातील नियुक्त्या रखडल्या

त्याशिवाय भर बैठकीतच दोघांनाही माईक बंद न ठेवता ड्रग्ज घोटाळ्यावरून एकमेकांवर टीका टिप्पणी करणे सुरूच ठेवल्याने पालकमंत्री सरनाईक यांना दोघांनाही थांबवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र, दोघेही ऐकून घेत नसल्याने पालकमंत्री सरनाईक यांनी शेवटी सर्वांचे माईक बंद ठेवायला सांगत जिल्ह्याचा विकास कामाचा निधी लॅप्स होणार नाही व ड्रग्ज प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नसल्याचे स्पष्ट करीत दोघांना शांत केले.

Pratap sarnaik, omrajenimbalkar, ranajagjitsinh patil
Devendra Fadnavis : राज्याच्या पोलीस प्रशासनावर फडणवीसांचाच दबदबा; रश्मी शुक्ला अन् देवेन भारतींसाठी केला मोठा आटापिटा!

राजकारण सोडून एकत्र येण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून जिल्ह्यातील विकास कामांचा व नियोजनाचा आराखडा ठरत असतो. मात्र, या ठिकाणी बैठकीतच दुसरे विषय काढून बैठकीला वादग्रस्त करू नका. येत्या काळात राजकारण सोडून एकत्र येऊन विकास कामे करू यात, असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले.

Pratap sarnaik, omrajenimbalkar, ranajagjitsinh patil
Tanaji Sawant News : तानाजी सावंतांना जे मंत्रिपद मिळालं, तेच आश्चर्यकारक...; एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com