Shahajibapu Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil : शहाजीबापूंनी भरसभेत स्टेजवरच स्वतःच्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या, म्हणाले ‘कशासाठी आपण हे पाप केलं...’

Ranjitsinh Naik Nimbalkar Defeat in Loksbah Election : जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हार स्वीकारला नाही, ही गोष्ट मनाला चाटून गेली आहे. जयकुमार गोरेंपेक्षा रणजिसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोल्याचा पाण्यासाठी जादा केलेले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 April : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यात त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत खंत व्यक्त करताना ‘ज्यांनी पाणी अडवलं, त्यांना खासदार केलं आणि जो पाणी देणार आहे, तो घरात बसून आहे. हाणून हाणून घ्यावसं वाटतंय असे म्हणत शहाजीबापू यांनी स्वतःच्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या. त्याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून रंगली आहे.

सोलापूरच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल जयकुमार गोरे यांचा सांगोला तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar), माजी आमदार दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.

शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर हे दोघं नसते तर सांगोल्याही पाणी मिळू शकलं नसतं. मंत्रालयातील बैठकीत अधिकारी रक्कम वाढते असे सांगत असताना जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्याला एकदा मंजूर झाले होते ना. मग देऊन टाकायचे, असे खडसावले. त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढे होऊन सर्वांच्या सह्या आणल्या आणि उजनीचे पाणी सांगोल्याला मिळाले.

उजनी पाणी मिळवून देण्यात, म्हैसाळमध्ये १२ आणि टेंभू योजनेत १० गावे टाकताना रणजितसिंह निंबाळकर, नीरा देवघर धरणातून एक टीएमसी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा नीरा डावा आणि उजवा कालवा बारमाही करण्याचे काम रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. राजेवाडीचं धरण भरलं पाहिजे, असे धोरण जयकुमार गोरे यांनी आणलं. राजेवाडीसाठी मी पाणी मागितलं होतं. पण माझी ताकद कमी पडतेय, हे माझ्या लक्षात आलं होतं. पण, गोरे यांनी रेटा लावला आणि आपले राजेवाडी धरणाचे काम झाले. तेच पाणी आपण गुरुवारी सकाळी सोडलं आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी सत्ता लागते, हे यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान माणसाने सांगितले आहे. आता जयाभाऊंचा सत्कार घेतला . घेतला की नाही. मग उद्या वाकडं चालायचं नाही. जयाभाऊ सांगेल, त्याच ठिकाणी, त्याच चिन्हाला मतं द्यायची. तुम्हाला आईची शपथ आहे, हात वर करा ज्यांनी पाणी अडवलं आहे, त्यांना खासदार केलं आहे आणि जो पाणी देणार आहे, तो घरात बसून आहे, हाणून हाणून घ्यावसं वाटतंय, अशी खंत व्यक्त करत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्वतःच्या थोबडीत दोन हाणून घेतल्या.

आपण काय माणसं आहेत, कशासाठी आपण हे पाप केलं आहे. आज जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हार स्वीकारला नाही, ही गोष्ट मनाला चाटून गेली आहे. जयकुमार गोरेंपेक्षा रणजिसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोल्याचा पाण्यासाठी जादा केलेले आहे. जयकुमार गोरेंचे जाता जाता काम झाले आहे, असेही शहाजीबापूंंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT