Sangli : राज्यात भाजपा- शिवसेना -राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार सत्तेत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. शिंदे गटाचे नेत्यांसह खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आगामी निवडणुका शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं जाहीरपणे सांगत आहेत असं असताना अजित पवारांच्या वाढदिवसादिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळासह शिंदे गटातही अस्वस्थता पसरली आहे. मिटकरींनी थेट अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
आता शिंदे गटाचे नेते व आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठं विधान केले आहे. यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा असते. मात्र, सध्याचे शिंदेंचे नेतृत्व भक्कम आहे आणि सर्वांना न्याय देणारे आहे. त्यामुळे येणारी २०२४ ची निवडणूक महायुती मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात लढवेल आणि विजयी होईल असे सांगत आमच्या सरकारकडे मोठे बहुमत असल्याने सरकारला कसलाही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे सांगलीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी अजितदादांनी आमदारांना केलेल्या निधीवाटपावर भाष्य केले आहे. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांना निधी तर जितेंद्र आव्हाड यांना नाही. यावर ग्रामीण आणि शहरी निधीमध्ये फरक असतो. त्यामुळे भविष्यात नगरविकासमधून निधी मिळेल. मात्र, तरी मी निधीवाटपावर समाधानी असल्याचे शहाजीबापूंनी सांगितले.
राज्यात एकीकडे पावसाचा हाहाकार आहे. मात्र सांगोला तालुक्यात पावसाची ओढ असल्याने येथील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणीही शहाजी बापू पाटील (ShahajiBapu Patil)यांनी केली.
मिटकरी काय म्हणाले होते..?
विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी या ट्विटसोबत एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यात अजित पवार यांची भाषणे दाखवण्यात आली आहेत. अजित पवार यांचे सभा, संमेलानातील व्हिडीओ दाखवण्यात आले आहे. तसेच अजितदादा यांना संघर्ष योद्धा संबोधत त्यांना निडर नेतृत्व आणि करारी व्यक्तीमत्त्वही म्हटलं आहे. अवघ्या 31 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे.
अजित पवार(Ajit Pawar) यांचा वाढदिवस असल्याने अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी अजितदादांचा उल्लेख अजित पर्व असा केला आहे. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.