Shaktipeeth Mahamarg and Kolhapur Politics : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांचा विरोध असल्याने तयार होण्याआधीच हा महामार्ग चर्चेत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता विरोध पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातून या रस्त्याची अधिसूचना रद्द करण्यात आली. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते प्राधिकरणाने पर्यावरण विभागाकडे दिलेल्या अहवालात कोल्हापूर जिल्ह्यातील ६१ गावांचा समावेश असल्याने पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा तापणार आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांचा विरोध झाल्यानंतर हा मुद्दा तापला होता. मात्र आता महायुती मधील नेत्यांच्या दोन भूमिकांमुळे पुन्हा एकदा हा मुद्दा तापणार आहे. एकीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही हे सांगितले आहे. तर दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ उद्योजकांंची बैठक घेत होणाऱ्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महायुतीतल्या दोन नेत्यांची दोन वेगवेगळी वक्तव्य पाहायला मिळत आहेत.शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर(Rajesh Kshirsagar) यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून उद्योजकांची बैठक घेतली.यावेळी शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून जे शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत त्यांना समजावून सांगून शक्तीपीठ होईल असे राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.
तर याच मुद्दयावरून हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही.याची अधिसूचना आधीच काढली आहे. लोकसभा निवडणुकीत या महामार्गामुळे फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. राजेश क्षीरसागर हे शहरात राहणारे आमदार आहेत. पण आम्ही ग्रामीण भागातील आहोत.ग्रामीण भागात या महामार्गाला विरोध होत आहे. शक्तिपीठ महामार्ग(Shaktipeeth Highway) कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही हे मी आधीच बोललो आहे. त्यामुळे आधी जो लेआउट काढला होता तो रद्द झाल्याचे अधिसूचना मी दाखवली आहे. असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या या वक्तव्यामुळे आणखीन शंका निर्माण झाली आहे. आधी काढलेला लेआउट रद्द झाला की पुन्हा नवीन लेआउट निर्माण केला याची शंका देखील आता उपस्थित होऊ लागली आहे. मात्र दोन नेत्यांमधील असलेली मतभिन्नता मुश्रीफ यांच्या वक्तव्यामुळे आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या बैठकीमुळे समोर आली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.