Shamburaj desai, Aditya thackrey Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai: प्रत्येकवेळी नेता बदलणारे शंभूराज देसाई नक्की आदित्य ठाकरेंवर आरोप का करतात?

Vishal Patil

विशाल पाटील 

karahad News : शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. दोन्ही गटाकडून एकमेकांवरील आरोपाची एकही संधी सोडली जात नाही. कराड परिसरातील महायुती सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई हे नेहमीच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतात. त्यांनी केलेल्या टीकेनंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी प्रत्युत्तर देताना देसाई यांच्यावर टीका केली.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत महायुती सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी जोरदार टीका केली. पालकमंत्री शंभूराज देसाई आदित्य ठाकरे यांच्यावर सतत टीका करत आहेत, कारण त्यांनी प्रत्येकवेळी पायरी बघून नेता बदलेला आहे. प्रत्येकवेळी ते सत्तेत असणाऱ्या नेत्यासोबत जुळवून घेतात, असा आरोप हर्षद कदम यांनी केला आहे. 

येत्या 10 जानेवारीला पाटण तालुक्यातील तळमावले येथे शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दाैऱ्याची माहिती कराड येथे देण्यात आली. यावेळी हर्षद कदम म्हणाले, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी गेल्या 20 वर्षात सत्तेत असणाऱ्या नेत्यासोबत जुळवून घेतले आहे. एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांच्यासोबत गेले आहेत, तेथे त्यांना त्यांचे काहीतरी वेगळेपण दाखवायचं. मी कोणीतरी फार मोठा नेता आहे, हे दाखविण्यासाठी त्याच्यासोबत गेले आहेत.

शंभूराज देसाईंना खुले आव्हान

कराड तालुक्यातील सुपने जिल्हा परिषद गटातून शंभूराज देसाई यांनी त्याच्या विचारांचा, त्याच्या मताचा एक उमेदवार निवडून आणावा. त्यासोबतच जिल्ह्यातही तुम्ही निवडणूक लढवून उमेदवार निवडूण आणा, मग कळेल कोण किती मोठे आहे. शंभूराज देसाई यांच्या भ्रष्टाचाराला लोक वैतागले आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार आणि एकास-एक अशी लढत झाली तर निश्चित निवडून येईल. शिवसेनेचे मतदान कुठेही हललेलं नाही, असाही दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा

पाटण तालुका विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही दावा करणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून पाटण तालुक्यात शिवसेना उमेदवार निवडून आला आहे. प्रत्येक पक्षाला आपल्याकडे मतदार वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हीही शिवसेनेला पाटण विधानसभा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी करणार आहोत. यावर महाविकास आघाडीचे नेते अंतिम निर्णय घेतील, असे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कदम यांनी सांगितले.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT