Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama

Shambhuraj Desai News : कुणबी प्रमाणपत्र ; शंभूराज देसाई म्हणाले, ही बाब माझ्यासाठी 'ऐच्छिक'..!

Kunbi Certificate Found In Patan Taluka : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर देसाईंनी मांडले मत...
Published on

Shambhuraj Desai News : पाटण तालुक्यात कुणबी नोंदी सापडत असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याही कुणबी नोंदी सापडल्या तर दाखला घेणार का ? असा सवाल उपस्थित केला असता, त्यावर ही बाब 'ऐच्छिक' असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता ऐरणीवर आला असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली डेडलाईन उद्या (24 डिसेंबर) संपत आहे. कुणबी दाखले शोधणे आणि प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. या दाखल्यात मंत्री, आमदार यांच्या देखील नोंदी सापडत आहेत. आता ते प्रमाणपत्र घेणार का, असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

Shambhuraj Desai
Sachin Sawant: ...मग यशवंतरावांची समाधी आहेच, आत्मक्लेश करायला! सावंतांनी अजितदादांना काढला चिमटा

कुणबी दाखल्याबाबतचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनाही विचारण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जावळी आणि देसाई यांच्या पाटण तालुक्यात कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर सापडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना कुणबी दाखला घेणार का ? असे विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी 'ऐच्छिक' असल्याचे सांगितले होते. त्यानंतर देसाई यांनीदेखील ही बाब माझ्यासाठी 'ऐच्छिक' असल्याचे म्हटले आहे.

आमचं बरं चाललंय...

ज्या परिवाराला कुणबी प्रमाणपत्राची गरज आहे, त्यांना पहिल्यांदा मिळावा. यासाठी प्रमाणपत्र घ्यायचे का नाही हे ऐच्छिक असले पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्याला हवं आहे, त्यांनी घ्यावं. देवाच्या दयेने, वाडवडिलांच्या आशीर्वादाने आमचं बरं चाललं आहे. तेव्हा एखाद्या गरिबाचा फायदा होत असेल, तर त्याला आधी मिळावा ही माझी भावना आहे. यामध्ये मुलगा, वडील, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा हे रक्ताचे नाते असते, याबाबत एक कायदा आहे.

या कायद्यानुसार सगळ्यांना मिळणार आहे. परंतु, घ्यायचं की नाही हे ऐच्छिक असले पाहिजे. त्यामुळे ज्याला गरज आहे त्याला कुणबी दाखल आधी मिळावा, असे देसाई यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Shambhuraj Desai
Ambadas Danve News : लोकसभेची उमेदवारी दानवेंना की खैरेंना, दानवे म्हणतात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com