Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : पृथ्वीराज चव्हाणांच्या चर्चेवर शंभूराज देसाई म्हणाले; महाविकासच्या उमेदवाराचे आव्हानच नाही !

Our grand alliance started preparing for the Lok Sabha elections : लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमची महायुती तयारीला लागली.

Umesh Bambare-Patil

Satara Loksabha News : महाविकास आघाडीकडून साताऱ्यासाठी कोणाच्या नावावर चर्चा करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अ देतंय की ब उमेदवार देतंय याचे महायुतीसमोर बिलकुल आव्हान नाही.आम्ही तयारीला लागलो आहोत, असे स्पष्ट मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्यातूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे येत आहे. याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, महाविकास आघाडीने कोणाच्या नावाची चर्चा करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. महायुतीसमोर कोणाचेही बिलकुल आव्हान नाही. सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास केला तर सहा मतदारसंघात कोरेगावचे आमदार महेश शिंदे, वाईचे आमदार मकरंद पाटील, सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि स्वतः मी पाटणचा आमदार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीतील आमच्या या सर्वांचे मतदारसंघ असल्यामुळे यांचे मताधिक्य मोठे आहे. यामुळे महाविकास (Mahavikas) आघाडी अ उमेदवार देयत कि ब देतेय याबाबत कोणतेही आव्हान वाटत नाही. सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमची महायुती तयारीला लागली आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ आणि वाशीम या ठिकाणी अजूनही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. यासाठी अजून 48 तासांहून अधिक वेळ आहे. शेवटच्या दिवशी सर्व अर्ज भरले जातील काहीही अडचण या लोकसभा मतदारसंघात येणार नसल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात उत्पन्न जमा करणारा हा उत्पादन शुल्क विभाग आहे, असे सांगून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, आमच्या विभागाला उत्पन्नाचं दिलेलं उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आहेत. 2023-24 मध्ये जवळपास 23 हजार 280 कोटी रुपये इतकं उत्पन्न सरकारच्या तिजोरीत जमा केलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक हजार 750 कोटी रुपयांनी हे उत्पन्न वाढवलेलं आहे. सुमारे आठ टक्के उत्पन्न वाढवलं असून, ही वाढ उच्चांकी आहे. यामध्ये अवैद्य मद्य विक्रीबाबतच्या गुन्ह्यांची नोंद तिप्पट आहे. प्रतिबंधात्मक कारवाई उच्चांकी आहे. तसेच हातभट्टीमुक्त गावांसाठीसुद्धा प्रयत्न सुरू आहेत. यामुळे 91 कोटींची महसुलात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited By Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT