Suresh Navale : 'शिंदेंसाठी राजकीय आयुष्य पणाला लावणाऱ्यांचा आता उमेदवारीसाठी जिवाचा आकांत'; सुरेश नवलेंनी लगावला टोला!

Suresh Navale Vs BJP : सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा करने बैठे है, अशी भाजपची अवस्था; शिवसेनेच्या माजी मंत्र्याचे भाजपवर गंभीर आरोप
Suresh Navale
Suresh NavaleSarkarnama

Loksabha Election 2024 : 'ज्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपले राजकीय आयुष्य पणाला लावले व त्यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेवला. आज त्यांनाच लोकसभेच्या उमेदवारीसाठी जिवाचा आकांत करावा लागत आहे. भाजपने शिवसेनेला वेठीस धरले असून, शिवसेनेतील नको असलेल्यांना बदलण्यासाठी चुकीचे सर्व्हे पुढे केले जात आहेत,' असा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी केला.

'ये बंद कराने आये थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा करने बैठे है', अशी भाजपची(BJP) अवस्था झाली आहे. मात्र, यातून त्यांनी बाहेर पडावे. अन्यथा शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असा इशाराही माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Suresh Navale
Jalna Loksabha Constituency : रावसाहेब दानवेंचा प्रचाराचा फंडाच न्यारा; म्हणाले, 'कार्यकर्त्यांनो, मी निवडून आलो तर...'

शिवसेनेत बंड करून राज्यात सत्तांतर घडविताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12 खासदारांनी साथ दिली. आता त्यांनाच उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. याबाबत बीडचे शिवसेनेचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सौम्य असले तरी ते भाजपसमोर झुकणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, सध्या जे चित्र आहे ते युतीसाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच नको असलेल्या शिवसेनेच्या(Shivsena) खासदारांना टाळण्यासाठी भाजपकडून चुकीचे सर्व्हे पुढे करून पक्षाची फसवणूक केली जात आहे. सर्व्हेचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत असे सांगितले जात असल्याचे प्रा. सुरेश नवले म्हणाले.

12 पैकी सहा मतदारसंघांतील विद्यमान खासदारांना उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. आयबीच्या रिपोर्टच्या नावाखाली विद्यमान खासदारांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा खेळ त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला आहे.

Suresh Navale
Parbhabni Loksabha Constituency : जानकरांसाठी दोन उपमुख्यमंत्री, तर जाधवांचा अर्ज भरायला केवळ दानवे अन् टोपे!

रामटेक, यवतमाळ, नाशिक, पश्चिम मुंबई, हातकणंगले, हिंगोली या मतदारसंघांत हा प्रकार घडत आहे. आयुष्यभर मतदारसंघात रात्रंदिवस झटणारे निवडून येणार नाहीत, असे सांगितले जाते. तुम्ही शिवसेनेत काम करत असला तरी तुमची उमेदवारी द्यायची का नाही हे आम्ही ठरवू, हा संदेश भाजप शिवसैनिकांना देत आहे. तसेच तुमचे 20 उमेदवार जाहीर केले. शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ लावणे कितपत योग्य? असा सवालही त्यांनी केला.

याचबरोबर विधानसभेच्या वेळी स्थिती अत्यंत गंभीर असेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. मित्रपक्षांचे खच्चीकरण करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. आगामी विधानसभेला तर प्रकार अत्यंत गंभीर असेल, अशी भीतीही सुरेश नवले यांनी व्यक्त केली. भाजपवर गंभीर आरोप करताना सुधारावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com