shambhuraj desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Dcc Bank Result : शंभूराज देसाईंनी उट्टे काढले : भाजपच्या पाटणकरांचा पराभव करत जिल्हा बॅंकेत मारली बाजी

Shambhuraj Desai Victory News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी पाटण सोसायटी मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी भाजपचे विद्यमान संचालक सत्यजित पाटणकर यांचा पराभव केला.

हेमंत पवार - Hemant Pawar

Satara, 03 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या १२ जागांसाठी झालेल्या मतदानाची आज (ता. ०३ नोव्हेंबर) सकाळी आठपासून मोजणी सुरू झाली आहे. पहिलाच निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान संचालक, भाजप नेते सत्यजित पाटणकर यांना पराभूत करत पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई हे पाटण सोसायटी मतदारसंघातून दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.

पाटण तालुक्यात शंभूराज देसाई यांचे गेल्या काही वर्षांपासून एकहाती वर्चस्व होते. मात्र, सहकार क्षेत्रावर पाटणकरांचा ताबा होता. मात्र, सहकारातील पाटणकरांचा दबादबा मोडीत काढत देसाई यांनी जिल्हा बॅंकेत दणदणीत मतांनी विजयी होत एन्ट्री केली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव करून सातारा जिल्हा बँकेत एन्ट्री केली आहे. मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री देसाई यांनी बाजी मारत पुन्हा एकदा पाटण तालुक्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यातच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराजे यांचेही प्रतिष्ठा पणाला लागली होती. रविवारी एक नोव्हेंबरला मतदान झाले होते. या मतदानासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास पालकमंत्री देसाई यांच्या समर्थक मतदारांना घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले होते. तर त्यांचे विरोधी सत्यजितसिंह पाटणकर यांनीही आपल्या समर्थक मतदारांना घेऊन मतदान केंद्र परिसरात हजेरी लावली होती.

मतदानानंतर लगेचच पालकमंत्री देसाई यांनी विजयाचा दावा केला होता. दरम्यान आज मंगळवारी जिल्हा बँकेचया निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सातारा येथे सुरू आहे. या मतमोजणीत पाटण सोसायटी गटातून पालकमंत्री शंभूराजे देसाई 58 मते घेऊन विजयी झाले आहेत. पालकमंत्री देसाई हे विजय झाल्यामुळे ते सातारा जिल्हा बँकेत संचालक म्हणून एन्ट्री करणार आहेत.

मागील निवडणुकीत निसटत्या मतांनी झालेल्या पराभवाचे उट्टे काढत देसाई यांनी यावेळी जोरदार प्लॅनिंग करत विजय मिळविला आहे. बेरजेचे राजकारण करत त्यांनी विरोधकांची बाजी पलटवत विजय मिळवला. यामध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांची समर्थ साथ लाभली आहे. मंत्री देसाई विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाचे उजळणी तो पाठक यांचे आतषबाजीत जल्लोष सुरू केला आहे.

SCROLL FOR NEXT