Satara Dcc Bank Result : साताऱ्यातील बड्या नेत्याने सूत्रं फिरवली; महायुतीच्या एका मंत्र्यासह त्यांचा मोहराही ‘डेंजर झोन’मध्ये?

Mahayuti News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बारा जागांचा निकाल तीन नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील लढतीमुळे संभाव्य निकालांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Satara Dcc Bank Result
Satara Dcc Bank ResultSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 02 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 12 जागांचा निकाल उद्या (मंगळवारी, ता. 03 नोव्हेंबर) होणार आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांमध्येच या 12 जागांसाठी चुरस असून काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने आखलेल्या डावपेचात महायुतीचा एक मंत्री आणि त्यांचा मोहराही सापडल्याची चर्चा रंगली आहे, त्यामुळे निकालाकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बॅंकेच्या २१ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. या नऊ जागांपैकी भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, तर शिवसेनेचा एका संचालकाचा समावेश आहे. उर्वरित १२ जागांसाठी रविवारी ९८ टक्के मतदान झाले आहे. त्याची मतमोजणी उद्या होणार आहे. त्यामुळे १२ जागांपैकी कोणा किती जागा जिंकणार यावर बॅंकेतील त्यांचे वर्चस्व सिद्ध होणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या १० वर्षांच्या नियमांमुळे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना निवडणुकीतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे बॅंकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई हे तीन नेतेच वरिष्ठ म्हणून कामकाज चालवण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्हा बॅंकेची १२ जागांपैकी सात जागांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर शिवसेना आणि भाजपमध्ये तीन ठिकाणी लढत झाली आहे. बॅंकेत राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. १२ जागांपैकी पाच जागांवर राष्ट्रवादीचे, चार जागांवर भाजपचे आणि तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Satara Dcc Bank Result
Solapur Dcc Bank : मोहिते पाटील, परिचारक, संजयमामा, आवताडे, हसापुरेंनी बाहेर काढले राजीनामास्त्र : 110 अ नुसार कारवाई होत नसल्याचा दावा; सुनावणीवरील निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून बाहेर राहूनही जिल्ह्यातील एका मातब्बर नेत्याने आपली रणनीती यशस्वीपणे राबविण्यात यश मिळविल्याची सांगण्यात येत आहे. आपल्या गटातील नेत्याना निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र त्यांनी टाकलेल्या डावात महायुतीचा एक मंत्री आणि त्या मंत्र्याचा समर्थक अडकल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Satara Dcc Bank Result
Satara Dcc Bank : सातारा Dcc बॅंकेच्या 12 जागांच्या निकालात राष्ट्रवादी भाजपला धोबीपछाड देणार? मोठा भाऊ जयकुमार गोरे की मकरंदआबा?

पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हा बॅंकेत एन्ट्री करणार की पुन्हा त्यांना नशीब दगा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्यजित पाटणकर पुन्हा बाजी मारणार, याचीही उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.