Shambhuraj Desai Vs Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai Vs Sanjay Raut : 'जिल्हा परिषद गटातून तरी निवडून येऊन दाखवा' ; शंभूराज देसाईंचं संजय राऊतांना आव्हान!

Loksabha Election 2024 : ...त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये नैराश्य आहे, असंही शंभूराज देसाई यांनी कराडमध्ये बोलून दाखवलं आहे.

हेमंत पवार

Karad Political news : उद्धव ठाकरे कधी नव्हे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले आहेत. त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.त्यामुळे त्यांच्यात नैराश्य आहे. संजय राऊत यांच्यासारखे विश्वज्ञानी माणसं त्यांच्यासोबत आहेत. दहा, पंधरा लाख मतदारांमधून निवडून आलेल्या खासदारांवर ते टीका करत आहेत. राऊत यांनी जिल्हा परिषद मतदारसंघातून तरी निवडून येऊन दाखवावं.' असे थेट आव्हान राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना दिले.

मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी आज महाराष्ट्र दिनी कराड (जि. सातारा) येथे माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तेरा खासदार आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर कधी नव्हे एवढे फिरायला लागले आहेत. त्यांना अपेक्षित एवढा प्रतिसाद मिळत नाही. लोक त्यांच्याबरोबर येत नाहीत. लोकांनी त्यांचे विचार स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच 'जेव्हा शिवसैनिक एकत्र होते त्यावेळी मिळणारा प्रतिसाद आणि सध्या मिळणारा प्रतिसाद यामध्ये तफावत आहे. संजय राऊत यांच्यासारखे विश्वज्ञानी काही माणसं त्यांच्याबरोबर आहेत. संजय राऊत(Sanjay Raut) दहा-पंधरा लाख मतदारांमधून निवडून आलेल्या खासदारावर टीका करतात. राऊत यांनी एखाद्या जिल्हा परिषद मतदार संघातून तरी निवडून येऊन दाखवावे. स्वतः कधी निवडून यायचे नाही स्वतः कधी लोकांमध्ये जायचे नाही आणि जे 10-15 लाख लोकांमधून निवडून येतात, त्यांच्यावर टीका करायची हा त्यांचा उद्योग सुरू आहे.' असंही शंभूराज देसाई म्हणाले.

संजय राऊत यांनी अमित शाह व नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या दौऱ्यासंदर्भात औरंगजेबाच्या स्वाऱ्या महाराष्ट्रावर सुरू आहेत, अशी बोचरी टीका केली होती. त्यावर मंत्री देसाई म्हणाले, 'संजय राऊत यांना माध्यमांनी महत्व देण्याचे कारण नाही. देशाला उंच शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेऊन ठेवले आहे. त्यांना देशातील जनतेने स्वीकारलेले आहे. ज्या नेतृत्वाला देशाने डोक्यावर घेतले आहे, ते एका बाजूला आहेत आणि संजय राऊत सारखी माणसे एका बाजूला आहेत. त्यांना निवडणुकीच्या मतदानातूनच उत्तर मिळेल.'

सीमावर्तींच्या पाठीशी राज्य शासन -

सीमावर्ती भागातील 850 गावातील विभागासाठी समन्वयक मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील व मी स्वतः काम करत आहे, असे सांगून देसाई म्हणाले, सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आजही महाराष्ट्र शासन ठामपणे उभे आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिक गावांना न्याय मिळाला पाहिजे, ती गावे महाराष्ट्रातच राहिली पाहिजेत यावर राज्य शासन ठाम आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT