Uday Samant: राज्यसभेला संभाजीराजेंचा अपमान, अवहेलना केली, आता कोल्हापूरच्या गादीचा पुळका का?

Uday Samant On MVA: "माझी प्रामाणिक इच्छा होती संभाजीराजे खासदार व्हावेत. मी चार वेळा सांगितलं होतं की, संभाजीराजे यांच्याकडून असं लिहून घेऊ नये. पण मला (त्यावेळच्या) शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं की, आपण उमेदवारी देतोय तर लिहून घ्यायला काय हरकत आहे."
Uddhav Thackeray, Uday Samant, Sambhaji Raje Chhatrapati
Uddhav Thackeray, Uday Samant, Sambhaji Raje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांकडून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा अपमान महायुतीकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांवर आज उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसेना ठाकरे गटाने संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांचा राज्यसभेला अपमान कसा केला? याची चिरफाड केली.

'लाव रे तो व्हिडिओ' सांगत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून राज्यसभेवेळी कोणता ड्राफ्ट लिहून घेतला. त्यांची कशी अहवेलना झाली याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. उदय सामंत यांनी आज कोल्हापूरात पत्रकार परिषद घेत एकच खळबळ उडवून दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून राज्यसभेला उमेदवारी मागितली होती. त्यानंतर जो काही प्रकार झाला तो पत्रकार परिषदेत मांडण्यात आला. उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, ज्या शाहू महाराजांना (Shahu Maharaj) भेटायला गेलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या मुलाचा कसा अपमान केला हे मी दाखवत आहे. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मी स्वतः संभाजीराजे यांची माफी मागितली होती. माझी प्रामाणिक इच्छा होती की संभाजीराजे हे खासदार व्हायला पाहिजेत. मला संभाजीराजे यांच्याबरोबर बोलण्यात गुंतवून ठेवले आणि इकडे संजय पवार यांना तिकीट दिलं, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जर संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांना आधीच सांगितलं असतं की, संजय पवार यांना तिकीट देणार आहे. तर संभाजीराजे यांचा अवमान झाला नसता. माझी नार्को टेस्ट करा, माझी प्रामाणिक इच्छा होती संभाजीराजे खासदार व्हावेत. मी चार वेळा सांगितलं होतं की संभाजीराजे यांच्याकडून असं लिहून घेऊ नये. पण मला (त्यावेळच्या) शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी सांगितलं की, आपण उमेदवारी देतोय तर लिहून घ्यायला काय हरकत आहे, असं सामंत यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीच संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्याची शिफारस केली होती. शरद पवार यांनी त्यावेळी राजवर्धन कदमबांडे यांना वारसाच्या मुद्यावरून उमेदवारी दिली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यावेळी प्रचाराचा मुद्दा वारसदार हाच केला होता. सीमाभागाच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत. त्याठिकाणी सर्व सोयी सुविधा आणि तरुणांना नोकरी देण्याचं काम आम्ही करतोय. सीमाभागाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितलं.

Uddhav Thackeray, Uday Samant, Sambhaji Raje Chhatrapati
Kolhapur Lok Sabha Election News : पंतप्रधान मोदींकडून समाज विभाजनाचा प्रयत्न; रमेश चेन्नीथला यांचा घणाघात

काय होता नेमका ड्राफ्ट?

ज्यावेळी उमेदवारी दिली जाईल त्यावेळी ते शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायत पासून खासदारकीपर्यंत शिवसेनेचा प्रचार करतील. संभाजीराजे जरी पुरस्कृत असले तरी सभागृहात आणि सभागृहाबाहेर पक्षाचेच काम करतील. संभाजीराजेंनी भूमिका मांडत असताना शिवसेनेचीच मानली पाहिजे. संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख हेच आमचे नेते आहेत हे मान्य केले पाहिजे, असा ड्राफ्ट लिहून घेण्यात आला होता.

Uddhav Thackeray, Uday Samant, Sambhaji Raje Chhatrapati
Maharashtra Politics: चार जूनला मोदींना कळेल, शरद पवार हाच महाराष्ट्राचा आत्मा!

ड्राफ्टवर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

कोणत्याही पक्षात काम करण्याचा निर्णय घेणे किंवा नाही? हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी ग्रामपंचायतपासून खासदारकीच्या स्थरापर्यंत पक्षाचे मुद्दे मांडणे योग्य ठरणार नाही. पण महाविकास आघाडीचे कोण पुरस्कृत करत असाल तर छत्रपती शिवरायांचा विचार गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न करेण. तसंच, गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करेल, असं संभाजीराजे बोलले शिवाय माझ्यासारख्या व्यक्तीची तुम्ही ज्या पद्धतीने अवहेलना करताय ती योग्य नाही. मला उमेदवारी द्यायची तर आता तुम्ही आमच्याकडे यावे असे सांगुन ते माझ्या शासकीय निवासस्थानावावरून निघून गेले होते, असा गौप्यस्फोट सामंत यांनी यावेळी केला.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com