Vishal Patil News : बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार? काँग्रेस हायकमांड नाराज...

Sangli Loksabha : सांगलीमध्ये काँग्रेसने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात उघडपणे विश्वजित कदम यांनी नाराजी बोलून दाखवली. मात्र, महाविकास आघाडीचे धर्म पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
Vishal Patil
Vishal PatilSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : सांगलीची जागा महाविकास आघाडीच ठाकरे गटाकडे गेली आहे. चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. मात्र, काँग्रेसचे नेते, उपाध्यक्ष विशाल पाटील Vishal Patil यांनी शिवसेनेचे सांगलीत ताकद नसताना त्यांना उमेदवारी का म्हणून बंड करत अपक्ष निवडणूक लढत आहेत. कोल्हापुरात बंडखोरी करणाऱ्या बाजीराव खाडे यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. मात्र, विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विशाल पाटलांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Vishal Patil
Uday Samant: राज्यसभेला संभाजीराजेंचा अपमान, अवहेलना केली, आता कोल्हापूरच्या गादीचा पुळका का?

सांगलीमध्ये काँग्रेसने Congress कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात उघडपणे विश्वजित कदम यांनी नाराजी बोलून दाखवली. मात्र, आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाना पटोले Nana Patole यांनी बंड करणाऱ्या विशाल पाटलांवर कारवाई हायकमांड करणार असल्याचे सांगितले होते. विशाल पाटलांच्या बंडाचा अहवाल समिती नेमून हायकमांड देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, विशाल पाटील यांना विशिष्ट कालावधी नाना पटोले यांच्याकडून देण्यात आला होता. मात्र, ते अपक्ष लढणार ठाम होते. आता वंचित बहुजन आघाडीने देखील त्यांना जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत मिळत आहेत.

विशाल पाटील यांच्या बंडाने थेट ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना फटका बसणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांचा मार्ग काहीसा सुकर झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून देखील विशाल पाटील यांच्यावरील कारवाई बाबत विचारणा करण्यात येत होती.

Vishal Patil
Jarange Patil Warning : मोदीसाहेब, महाराष्ट्रातील तुमच्या कर्त्या नेत्याला थोडी समज द्या; जरांगे पाटलांचा इशारा कोणाकडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com