Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan : देसाईंचे आजोबा थोर, पण हे चोर निघाले...भास्कर जाधवांचा घाणाघात

Bhaskar Jadhav पाटणला आयोजित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात श्री. जाधव बोलत होते.

जालिंदर सत्रे

Patan News : ज्या शिवसेना प्रमुखांनी लाल दिवा देऊन सन्मान केला, त्यांचाच पक्ष संपवण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेUdhav Thackeray यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी केले. मंत्रीमंडळात समावेश झाला, त्यावेळी ३७ वर्षांनंतर लोकनेत्यांच्या घराला मान दिला, अशी मुक्ताफळे उधळणारी वक्तव्य करणारे श्री. देसाई यांचे आजोबा थोर होते. पण हे चोर निघाले. शंभूराज देसाई यांची ओळख आता चोरवाटा दाखवणारा अशी झाली आहे, अशी घाणाघाती टीका आमदार भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी केली.

श्रीमंत रणजितसिंह पाटणकर स्मारक मंदिरात आयोजित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख हर्षद कदम, उपजिल्हा प्रमुख रवि पाटील, तालुका प्रमुख सुरेश पाटील, चिपळूण तालुका प्रमुख संदीप सावंत, सचिन आचरे, गौरव परदेशी, दादा पानस्कर, भरत पवार उपस्थित होते.

मंत्री देसाई यांचे नाव घेतलं तर लोक शिव्या देतात. 'चंबू' पुराणाचा चोथा झालेला आहे, अशा शब्दांत मंत्री देसाई यांचा समाचार घेऊन भास्कर जाधव म्हणाले, राजकारणाची उबळ आली आहे. थोर महापुरुषांची बदनामी करून राजकारण केले जात आहे. महाराष्ट्राचे प्रश्न संपले का, तर नाही. मात्र, भाजपने संस्कृती, लोकशाही व समाज व्यवस्था बिघडण्याची सुपारी घेतली आहे.

सत्तेची मस्ती, दहशत या जोरावर खाजगीकरण आणि राजकीय पक्ष संपवण्यासाठी कुटील डाव खेळले जात आहेत. सत्तेच विकेंद्रीकरण झाले पाहिजे यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज संकल्पना अंमलात आणली व देशाला दिशा दिली.

पुढच्या काळात महिला, ओबीसी व मागासवर्गीय आरक्षण देऊन समाज धुरीणांनी प्रवाहाच्या बाहेर असणारे समाज प्रवाहात सामील केले. भाजपने उलट्या दिशेने कारभार सुरू केला असून अधिकार केंद्रीत करून लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी पाउले उचलली आहेत त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT