Narendra Modi-Sharad Pawar-Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pawar-Modi Solapur Tour : शरद पवार अन्‌ नरेंद्र मोदी एकाच दिवशी सोलापूर दौऱ्यावर; राज्याला उत्सुकता!

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नातं जगजाहीर आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नातं जगजाहीर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या दोघांची कायम चर्चा होत असते. आताही हे दोघे एकाच दिवशी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे या दौऱ्याची राजकीय वर्तुळाला कमालीची उत्सुकता आहे. (Sharad Pawar and Narendra Modi visit Solapur on the same day)

लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोर्चेबांधणी आणि तयारी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (ता. 19 जानेवारी) सोलापुरात येत आहेत. सोलापुरातील कुंभारीच्या रे-नगर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या संकल्पनेतून कामगारांसाठी घरे उभारण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात त्यातील १५ हजार घरकुलांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी यांचा हा सोलापूर दौरा आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होत आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांत भाजपचा उमेदवार जिंकला आहे. मात्र, यावेळी भाजपला निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याबाबतही जनतेत नाराजीची भावना आहे. त्यातच त्यांच्या जातप्रमाणपत्राच्या वादामुळे त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये नकारात्मक भावना आहे, त्यामुळे भाजपला सोलापूर जिंकण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही शुक्रवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते प्रथम सांगोला येथे (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख युवा मंचच्या वतीने आयोजित कृषी महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. सांगोल्यातील कार्यक्रमानंतर पवार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यात शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. पवार यांच्यासोबत मंंगळवेढ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही व्यासपीठावर एकत्र येणार येत आहेत.

मंगळवेढ्यातील कार्यक्रमानंतर शरद पवार हे सोलापुरात मुक्कामाला येणार आहेत. या मुक्काम ते कोणाला गळाला लावतात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच्या दिवशी पवार हे माजी मंत्री शिंदे यांच्यासोबत माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.

शरद पवार यांची राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत शहरात मजबूत आहे. आगामी निवडणुकीच्यानिमित्ताने महेश कोठे हे पवारांच्या मार्गदर्शनाखाली काय स्ट्रॅटेजी आखतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने चार्ज करतात, याचीही उत्सुकता सर्वांना आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT