Mumbai News : दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध कर आणि वीजबिलाची वसुली जोरात सुरू आहे. दुष्काळामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकारने वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. शेतकरीबांधवांनो, अशा नालायक सरकारला अजिबात सोडू नका. याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आगामी लाेकसभेसाठी आपण सर्वांनी सिद्ध राहावे. जो जो शेतकऱ्यांच्या मुळावर उठेल, त्याला जागा दाखवण्याचे काम करावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. (Farmers, don't leave this worthless government at all : Vijay Wadettiwar)
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नगर जिल्ह्यात अधिकारी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने करवसुलीची मोहीम राबवत आहेत. सरकारने दुष्काळ जाहीर करूनही अधिकारी वसुली करीत असतील तर त्यांना सरकारचे आदेश मिळाले नाहीत की मंत्र्यांचे आदेश कोणी ऐकत नाहीत, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वडेट्टीवार म्हणाले की, दुष्काळ जाहीर करून सरकारने सवलतीच्या घोषणा केल्या. त्या घोषणा कागदावरच असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नगर जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने वसुलीची मोहीम सुरू केल्यानंतर हे लक्षात आले आहे. रोजगार हमी योजना, शिक्षण उपकर, महसूल, शेतसारा हे कर आणि वीजबिलाची वसुली अधिकाऱ्यांनी जोरात सुरू केली आहे. सरकार जर निर्णय घेत असेल, तर तो निर्णय खालच्या स्तरापर्यंत जात नाही का?, हा खरा प्रश्न आहे.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने अधिवेशनाच्या काळात मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांना फार काही दिल्याचा आव आणला होता. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप या सरकारने केलेले आहे.
कुठल्याही दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा तर नाहीच, कुठलीही सरकारी मदत तर दिली नाही. पण त्याच पिचलेल्या शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने कर आणि वीजबिलाची वसुली जोरात करण्यात येत आहे. सरकारची ही भूमिका शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
ते म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची सोडून त्यांना वाऱ्यावर सोडण्याची सध्याच्या सरकारची भूमिका दिसत आहे. शेतकरीबांधवांनो, अशा नालायक सरकारला अजिबात सोडू नका. त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आगामी लाेकसभेसाठी आपण सर्वांनी सिद्ध राहावे. जो जो शेतकऱ्यांच्या मुळावर उठेल, त्याला जागा दाखवण्याचे काम शेतकऱ्यांनी करावे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.