Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar On Ram Temple : पवारांचा थेट मुद्द्यालाच हात; 'मंदिर वहीं बनाएंगे' म्हणणाऱ्या भाजपला दाखवली 'जागा'

हुकूम मुलाणी

Maharashtra Political News : सध्या देशातील वातावरण राममय झाले आहे. या वातावरणाचा भाजप लोकसभेसाठी पुरेपूर फायदा उचलणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवारांनी राम मंदिरावरून भाजपला चांगलेच फटकारले आहे. मंदिर वहीं बनाएंगे, असा नारा देणाऱ्या सरकारने मात्र मूळ ठिकाण सोडून दुसऱ्याच ठिकाणी मंदिर बांधल्याकडे लक्ष वेधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.

सोलापूर येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी (Sharad Pawar) सत्ताधारी भाजपसह पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी काँग्रेसच्या योगदानाबाबतही माहिती दिली. पवार म्हणाले, की राम मंदिराच्या प्रश्नात हिंदू-मुस्लिम वाद होता. तत्कालीन काँग्रस सरकारने या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन कमिट्या नेमल्या होत्या. त्यातील रामजन्मभूमी न्यास या समितीचा मी अध्यक्ष होतो, तर राम मंदिराचे कुलूप राजीव गांधींनी उघडले होते, याचीही आठवण पवारांनी करून दिली.

राम मंदिराबाबत (Ram Temple) बोलताना पवारांनी भाजपला मंदिराच्या इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले, की रामजन्मभूमी न्यास कमिटीचा अध्यक्ष असताना मशीद पाडली, तेथे मंदिर बांधण्याची भूमिका मांडली होती. दरम्यान, राम मंदिराचा दोन वर्षांपूर्वी निकाल लागला. आज जी मूर्ती ठेवली ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवली आहे. त्यामुळे मंदिर वहीं बनाएंगे म्हणणाऱ्यांनी आता आपली भूमिका बदलली आहे. आता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रम एका विशिष्ट समाजाचा असल्याचे दाखवले जात आहे, असा आरोपही पवारांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी पवारांना निमंत्रणपत्रिका मिळाली आहे. मात्र पवारांनी सोहळ्याला न जाता मंदिर पूर्ण झाल्यावर दर्शनाला जाईन, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, आता देशात निवडणुकीचे वातावरण आहे. या वातावरणात तेथे जाण्याची गरज नाही. मात्र अयोध्येत राम मंदिरात जाऊन माझ्या भावना व्यक्त करणार आहे. आता राज्यात एकीकडे दुष्काळाची स्थिती असताना अयोध्येत मात्र सात हजार कोटींचा खर्च केला जात आहे, असेही पवार म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT