Ram Temple consecration : मोठी बातमी! महाराष्ट्रात 22 जानेवारीला सुटी जाहीर

Maharashtra Government : केंद्राकडून हाफ डे, तर राज्यांची पूर्ण दिवस सुटी...
Eknath Shinde, Ram Temple
Eknath Shinde, Ram TempleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. हा सोहळा देशभर उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी केंद्राने केंद्रीय सरकारी कार्यालयांना हाफ डे सुटी जाहीर केलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रानेही राज्यात 22 जानेवारीला सुटीच जाहीर केली आहे. सरकारने याबाबतचा अध्यादेश जाहीर केला आहे. दरम्यान, देशभरातील आठ राज्यांनी सुटी जाहीर केली असून इतर राज्यांत सुटी जाहीर करण्याची मागणी होत आहे.

देशात तब्बल 500 वर्षांनंतर राम मंदिर (Ram Temple) बांधले जात आहे. या मंदिराच्या लोकर्पण सोहळ्यानिमित्त सुटी जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान, केंद्र सरकारने, केंद्रीय सरकारी कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली . तर राज्यात सुटीबाबतचा निर्णय घेण्याचा निर्णय केंद्राने राज्य सरकारकडे सोपवला होता. त्यानुसार राज्याने आपल्या अधिकाराचा वापर करून 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. या अध्यादेशावर उप सचिव रो. दि. कदम पाटील यांची स्वाक्षरी आहे.

Eknath Shinde, Ram Temple
Vijay Wadettiwar : शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं, तेच त्यांना सोडून गेले; काय वाटत असेल त्यांना?

दरम्यान, देशातील महाराष्ट्रासह इतर सात राज्यांनी सुटी जाहीर केलेली आहे. छत्तीसगड, गोवा, ओडिशा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा या राज्यांत सार्वजनिक सुटी असणार आहे. तर केरळ, झारखंडमध्ये सुटीची मागणी करण्यात येत आहे. मात्र आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, लक्षद्वीप, पुद्दुचेरी येथे अद्याप सुटी जाहीर केलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर लोकार्पण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहे. आता राज्य सरकारकडून सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Ram Temple
Shivendraraje Bhonsle : आधी शेजारी-शेजारी बसले, नंतर डिवचले; शिवेंद्रराजे उदयनराजेंना काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com