Satara Political News : खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या स्टाइलने लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यातल्या त्यात त्यांच्या कॉलर उडवण्यावर तर अनेकजण फिदा आहेत. आता हीच कॉलर उडवण्याची स्टाइल करत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी साताऱ्यातील पाटणमधून उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले आहे. भाषण संपल्यानंतर खास लोकांच्या आग्रहास्तव आपली कॉलर उडवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आमनेसामने आहेत. शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पवारांची पाटणमध्ये जाहीर सभा झाली. या वेळी पवारांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. पवारांचे भाषण संपल्यानंतर लोकांमधून एकच जल्लोष झाला. त्यातील काहींनी पवारांकडे कॉलर उडवण्याचा आग्रह धरला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पवारांनीही उत्स्फूर्तपणे कॉलर उडवली. पवारांनी कॉलर उडवताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
शरद पवार Sharad Pawar म्हणाले, सातारा जिल्हा देशातील एक वेगळा जिल्हा आहे. येथील लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन सपर्पित केले. आता राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारत भूषण देण्याची मागणी होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मुंबईत चव्हाण यांचं स्मारक आहे, संसदेत त्यांचा फोटो आहे. त्यांच्या अनेक कार्याची नोंद घेण्यासारखी आहे. मात्र आम्ही कधी हा विषय निवडणुकीचा मुद्दा केला नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi लोकांची फसवणूक केली. दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या सरकारमध्ये देशभरात महागाई, बेरोजगारी वाढली. दोन कोटी रोजगार निर्मिती करणार असे ते म्हणाले होते. मात्र, देशातील 100 पैकी 87 तरुण बेरोजगार आहेत. ते मात्र कायम काँग्रेसवर टीका करत असतात, मात्र स्वतः काय केले हे मोदी सांगताना दिसत नाहीत, अशा शब्दांत पवारांनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला.
शशिकांत शिंदेंनी ठोकला शड्डू
सातारा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्यावर मुंबई बाजार समतीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर ते म्हणाले, गादीचा मान ठेवत उदयनराजे भोसले यांना निवडून दिले. त्यांनी मात्र छत्रपतींच्या स्मारकाकडे दुर्लक्ष केले. राज्यात महाविकास आघाडी आणि देशभरात इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर रोष वाढला असल्याचे सांगून शिंदेंनी सरकावर टीका केली. सरकारने माझ्यावर आणखी कितीही गुन्हे दाखल करूद्यात, मी मात्र शरद पवारांची साथ कधीही सोडणार नाही, असा निर्धार करत शिंदेंनी सरकारविरोधात शड्डू ठोकला.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.