Priyanka Gandhi Latur : महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार पाडलं; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात

Shivajirao Kalge : आज संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. त्यासाठी त्यांना ४०० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. संविधान बदलले तर तुमचे अधिकार कमी करण्याचा डाव या मोदी सरकारचा आहे.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiSarkarnama

Latur Political News : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना फोडून भाजपने शिंदे गटाला सोबत घेत सरकार बनवले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटालाही सरकारमध्ये सामावून घेतले. यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी Priyanka Gandhi यांनी भाजपचा समाचार घेतला. भाजपने पैशांच्या जोरावर राज्यातील लोकांनी निवडलेले सरकार पाडले, असा घणाघात करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे Shivajirao Kalge यांच्या प्रचारार्थ लातूरमध्ये गांधी आल्या होत्या. या वेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकारकडून दहा वर्षांत देशातील लोकशाहीला दुबळे बनवण्यासाठी प्रयत्न केले गेले. महाराष्ट्रात लोकांनी निवडून आणलेले सरकार पैशांच्या बळावर पाडले. तुम्ही निवडून दिलेले आमदार खरेदी केलेले आहेत. हा सर्वात मोठा गुन्हा आहे, जो तुमच्या डोळ्यांसमोर केला गेला.

आज संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. त्यासाठी त्यांना ४०० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. संविधान बदलले तर तुमचे अधिकार कमी करण्याचा डाव या मोदी सरकारचा आहे, असा घाणाघात प्रियंका गांधींनी केला.

भाजपचे नेते म्हणतात की, मोदी Narendra Modi चुटकीसरशी जगातील कुठलेही युद्ध बंद करत आहेत. हे खोटे असून त्यांनी मात्र चुटकीसरशी देशातील रोजगार बंद केले, महागाई वाढवली. एकीकडे लोक पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवत आहेत, तर दुसरीकडे रोजगार नाहीत. फक्त पाच किलो राशनमध्येच तुम्ही खूष राहा, असे मोदी सांगत आहेत. मोदींच्या दहा वर्षांच्या सरकाने देशाला महागाई हेच मोठे गिफ्ट दिले आहे, असा समाचारही गांधींनी मोदी सरकारचा घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Priyanka Gandhi
Uttam Jankar News : अजित पवार कोब्रा तर मी चिवट मुंगूस; उत्तम जानकर नेमके काय म्हणाले?

देशातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मोदींनी उद्योगपतींचे तब्बल 16 लाख कोटी रुपये माफ केले. तर शेतकऱ्यांवर जीएसटी थोपवून वसुली सुरू आहे. त्यांचे मंत्री शेतकऱ्यांवर जीप चढवतात, महिलांच्या अत्याचारावरही ते चिडीचूप राहतात. निवडणूक आली की मोठमोठे वायदे केले जातात. 15 लाख रुपये, दोन कोटी रोजगारावर कुणी बोलत नाही. गेल्यावेळी हेच प्रश्न होते, मात्र धार्मिक वातावरण करून पुन्हा आपले मत घेतले जात आहेत. आता हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही गांधींनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Priyanka Gandhi
Satara Lok Sabha Election 2024 : 'कितीही गुन्हे दाखल करा शरद पवारांची साथ सोडणार नाही'; शशिकांत शिंदेंनी ठणकावलं!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com