Amit Bhangre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांची विधानसभेसाठी 'यंग ब्रिगेड' तयार; रोहित पाटलांनंतर आता दुसरा उमेदवार जाहीर

Sunil Balasaheb Dhumal

Ahmednagar Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि बहुतांश नेते, पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवारांकडे कोण, असा प्रश्न पडला होता. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपल्या दीर्घ अनुभवाच्या जोरावर लोकसभेत नवे चेहरे निवडून आणले.

आता विधानसभेसाठी आपल्या खात्यात असलेल्या मतदारसंघातून नव्या रक्ताच्या तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित पाटील यांच्यानंतर पवारांनी आज नगरमधील अकोला मतदारसंघात अमित भांगरे यांची उमेदवारी जाहीर केली.

अकोले विधानसभेचे आमदार किरण लहामटे Kiran Lahamate यांनी तळ्यात-मळ्यात करत अखेर विकासाच्या नावाखाली अजित पवार गटात गेले. आता पवारांनी त्यांच्याविरोधात अमित भांगरे यांची उमेदवारी जाहीर करून लोकांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अकोल्यातून अजित पवार गटाचे लहामटे आणि शरद पवार गटाचे भांगरे अशी लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

यावेळी शरद पवार Sharad Pawar म्हणाले, अकोला तालुका राज्यातील आदिवासी बहुल, अतिवृष्टीचा, भंडारदरा धरणाचा तालुका आहे. दुष्काळी नगरला पाणी देण्याची भूमिका घेणारा तालुका आहे. या तालुक्यात लोकाच्या हिताची जपणूक करणारे नेतृत्व जन्मला आले. त्यात यशवंतराव भांगरे यांचे नाव घ्यावे लागेल.

विधानसभेत पहिल्यांदा गेले त्यावेळी त्यांनी लोकांचे आदिवासींचे प्रश्न प्रभावी मांडले. नंतर ही जबाबदारी अशोकरावांनी घेतली. दुर्दैवाने नियतीचे सांगणे काही वेगळे होते. आणि ते आपल्यातून लवकर निघून गेले. मात्र त्यांचा विचार होता की नवीन पिढी तयार करायची.

एका कार्यक्रमासाठी नगरला आलो होतो. त्यावेळी अशोकरावांनी सांगितले होते, की माझे तुमच्याकडे काहीही मागणे नाही. फक्त एकच काम करा की माझ्या मुलावर लक्ष ठेवा. अमितवर लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर सभेत घेतला होता. त्यावेळी डोळ्यांत पाणी आले होते. त्यांना चिंता अमितची नव्हती, मात्र अकोल्यातील जनतेची होती. आज त्यांचा शब्द तुम्ही लोकांनी पाळला. आता अमितच्या मागे उभे राहा, असेही पवारांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT