Satara Political News : सध्या आमच्यापुढे भाजपचे आव्हान असून त्यांनीच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. जे भाजपसोबत गेलेत ते किती दिवस त्यांच्यासोबत राहतील हे सांगता येत नाही. पण, सोडून गेलेल्याना शरद पवार सोडत नाहीत, त्यांना निवडणुकीत पडतातच, असा सूचक इशारा राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिला.
सातारा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या मेळावा व संघटनाबांधणीसाठी रोहिणी खडसे दौऱ्यावर आल्या होत्या. राष्ट्रवादी भवनात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही स्पष्ट केले. 'मी लोकसभेला इच्छुक नाही, मी विधानसभा लढणार असून माझी उमेदवारी जयंत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच फायनल केली आहे. त्यामुळे मी मुक्ताईनगरमधून निवडणूक लढणार आहे.'
रोहिणी खडसे (Rohini Khadse) म्हणाल्या, आज महिला बैठकीचे नियोजन केले आहे. संघटन मजबुतीसाठी हा पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे. पक्षाला मिळणारा प्रतिसाद चांगला असून महागाईमुळे महिला असंतुष्टतेचे वातावरण आहे. त्यामुळे महिला शरद पवार गट राष्ट्रवादीत येऊ लागल्या आहेत. आमच्याकडे महिलांत मतभेद नाहीत, मनभेद आहेत. त्यातून महिला व्यक्त होत असून त्यांच्या भावना समजून येत आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादीतील फुटीबाबत त्या म्हणाल्या, 'पक्ष फोडणे हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही विचारधारेच्याविरोधात लढण्यासाठी खंबीर आहोत. सध्या आमच्यापुढे भाजपचे आव्हान असून त्यांनीच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यांच्या विचारधारेच्याविरोधात आम्ही लढणार आहोत. आज राष्ट्रवादीतून जे भाजपमध्ये गेले आहेत, ते किती दिवस त्यांच्याबरोबर राहतील हे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सोडून गेलेल्यांना शरद पवार (Sharad Pawar) सोडत नाहीत, त्यांना निवडणुकीत पडणारच,' असा थेट इशारा अजित पवार गटालाही दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या नेत्या कविता म्हेत्रे, संगीता साळुंखे, समिद्रा जाधव, संजना जगदाळे, दीपक पवार, राजकुमार पाटील उपस्थित होते.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.