Sambhaji Patil Nilangekar, Sanjay Bansode
Sambhaji Patil Nilangekar, Sanjay BansodeSarkarnama

Latur BJP Politics : संभाजी पाटील-निलंगेकर लोकसभेच्या आखाड्यात? बनसोडेंच्या ‘गुड न्यूज’ने रंगली चर्चा

Lok Sabha Election : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी की मंत्रिमंडळात समावेश होणार, या चर्चांना उधाण...

Latur News : माजी मंत्री आमदार संभाजी पाटील-निलंगेकर आणि राज्याचे युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यातील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे दोघेही एकमेकांचे कौतुक करताना थकत नाहीत. बनसोडे यांनी निलंगा येथील भेटीत निलंगेकरांसाठी लवकरच गुड न्यूज मिळणार असल्याचे सांगत सगळ्यांची उत्सुकता वाढवली होती. यावरून आता संभाजी पाटील-निलंगेकर यांना राज्य मंत्रिमंडळविस्तारात संधी मिळणार, की मग धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी? अशा चर्चांना उधाण आले आहे.

लातूर (Latur) लोकसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना पत्ता कापण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्याऐवजी मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांना लातूरमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचीही जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात होत आहे. बनसोडे आणि निलंगेकर यांची वाढती जवळीक पाहता ही शक्यता खरी ठरते की काय? असेही बोलले जात आहे.

Sambhaji Patil Nilangekar, Sanjay Bansode
Nanded BJP News : मीच जिल्हाध्यक्ष म्हणणाऱ्या सुधाकर भोयर यांना नारळ, चिखलीकर समर्थकाची वर्णी..

दुसरीकडे संभाजी पाटील-निलंगेकर (Sambhaji Patil-Nilangekar) हे शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (LokSabha Election) लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय बनसोडे यांनी निलंगेकरांना दिलेली गुड न्यूज नेमकी कोणती? याची उत्सुकता आता त्यांच्या समर्थकांना लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्यानिमित्ताने आयोजित रामकथा समारोपात बनसोडे व निलंगेकर एकत्र आले होते.

यावेळी निलंगेकरांसाठी लवकरच 'गुड न्यूज' असेल, असे संकेत त्यांनी जाहीरपणे दिले होते. लातूर लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून याबाबत तयारी करण्यात येत आहे. निलंगेकर यांनीही धाराशिव मतदारसंघातून चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले. यामध्ये लातूर जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा असताना अंतर्गत वादात ती हुकली.

मंत्रिमंडळविस्ताराचे अनेक मुहूर्त निघाले, परंतु त्या विस्तारानेही हुलकावणी दिली. मंत्रिमंडळविस्तारात संधी मिळावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अजूनही आहे. मात्र आता ती शक्यता कमीच दिसते. दुसरीकडे निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर लोकसभा निवडणूक झाली, तर काँग्रेसमधील देशमुख गटाला ते मॅनेज होणार नाहीत. यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुका झाल्या, पक्षाला मोठे यशही मिळाले यातून ते स्पष्ट झाले होते.

Sambhaji Patil Nilangekar, Sanjay Bansode
Dharashiv News : निवडणूक विभागात उल्लेखनीय, नावीन्यपूर्ण काम...! जिल्ह्याला मिळाले पाच पुरस्कार...

त्यामुळे भाजप निलंगेकर यांना डावलून यंदाची लातूर लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. अशावेळी निलंगेकर यांनीही लातूरमध्ये लक्ष घालण्याऐवजी धाराशिवमधून लोकसभेसाठी चाचपणी केल्याची चर्चा आहे. औसा विधानसभा मतदारसंघाला निलंगा तालुक्यातील 68 गावे जोडण्यात आली आहेत. शिवाय उमरगा मतदारसंघातील मुळज हे संभाजी पाटील यांचे आजोळ असल्याने या भागात निलंगेकर व चालुक्य घराण्याला मानणारा मतदार आहे. त्यामुळे त्यांनी धाराशिव मतदारसंघातून लोकसभा लढवावी, असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. शिवाय मागील शिवसेना-भाजपा युतीत ही जागा शिवसेनेकडे होती, आता सेनेमध्ये दोन गट पडले असून ही जागा भाजपाकडे गेल्यास इथे संभाजी पाटील-निलंगेकर चांगला पर्याय ठरू शकतात. समर्थकांचा तसा आग्रह असल्यामुळे निलंगेकर यांनीही त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

(Edited By - Rajanand More)

R...

Sambhaji Patil Nilangekar, Sanjay Bansode
Prakash Ambedkar: 'निजामी मराठ्यांपासून' जरांगेंनी सावध राहावे, ते घात करतील!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com