राजेंद्र त्रिमुखे
Nagar News : तुम्ही साधं ऊसाचे गुऱ्हाळ चालवले नाही अशी खोचक टीका आमदार रोहित पवार यांनी कर्जत 'एमआयडीसी' प्रशावरून आमदार राम शिंदे यांच्यावर केली होती.कुठेतरी मनात रुतलेल्या या टीकेला आता राम शिंदे यांनी उत्तर दिले आहे."तुमचे आजोबा चार वेळा मुख्यमंत्री, तुमचे चुलते पाच वेळा उपमुख्यमंत्री आणि माझा बाप एक सालगडी. तुमचे तरी ते चुलत होते पण माझा सख्खा नातू उद्योगधंदे उभारील,असे खोचक प्रतिउत्तर शिंदे दिले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा एमआयडीसीवरून सुरू झालेला रोहित पवार-राम शिंदे यांचा संघर्ष आता कुठे वैयक्तिक पातळीवर येऊ पाहतो काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. आरोपाला प्रतिआरोप, उत्तराला प्रतिउत्तर अशीच काहीशी परस्थिती कर्जत-जामखेड मध्ये पवार-शिंदे या राजकीय विरोधातून दिसून येत आहे.
'एमआयडीसी' मुद्यावर अधिवेशनात राम शिंदेंना उद्देशून तुम्ही साधे ऊसाचे गुऱ्हाळ चालवले नाही, असा घणाघात रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. त्याला शिंदे यांनी एमआयडीसीत निरव मोदी आदींच्या जमिनींचा संदर्भ होता. तसेच शिंदेंमुळे अधिसूचना निघत नसल्याचा रोख होता.
राम शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर रोहित पवारांना काहीसे स्पष्ट आणि खोचकपणे दिले आहे. या बाबत शिंदे म्हणाले की, "माझ्या घराचा 2019 मध्ये खूप मोठा विषय केला गेला. कोणीही या आणि माझं घर पहा. केवळ दोन हजार स्क्वेअर फुटात मी घर बांधले. आता यांनी दोन एकरात घर बांधले. त्यातील अर्धा एकरात बांधकाम केले. आता याचीही चर्चा झाली पाहिजे." ते म्हणतात मी खूप मोठमोठे धंदे करतो. आता तुमचे आजोबा चार वेळेस मुख्यमंत्री, चुलते पाच वेळेस उपमुख्यमंत्री. आता आमच्या बापाने साल घातली. मी आमदार झालो, मंत्रीपण झालो. माझा नातू करेल मोठे मोठे धंदे. आता तुमचे चुलत आजोब,चुलत काका होते. पण माझा सख्खा नातू हे उद्योगधंदे उभा करेल."
"मी चॅलेंज केलंय, माझा एकही गुंठा कर्जत मध्ये नाही. आता या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? तुम्ही तीन वर्षात किती गुंठे, एकर किती जमा केले हे सांगायला पाहिजे ना. गोरगरिबांच्या मागासवर्गीयांच्या सोसायटीवर सरकारचा शिक्का का आणि कशासाठी लागला हे सांगायला पाहिजे की नाही. राम शिंदेच्या नावावर एक एकराचा उतारा काढून दाखवा, नाही केलं आम्ही. तुम्ही एवढ्या लवकर कसं केलं हे सांगायला पाहिजे तुम्ही."