Pune News : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या उदघाटन सोहळ्यावरून नाराजीचे अस्त्र उपसून थेट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांवर आरोप केलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच पुढाकार घेतला आहे. या कामासाठी मेधाताईंनी पुढाकार घेतल्याचे गडकरींनी जाहीरपणे सांगितले. त्यामुळे मेधाताई काहीसा दिलासा मिळाला असला तरी भविष्यात मेधाताईंची नाराजी वाढू नये याची दखल घेऊन गडकरी त्यांच्या घरी गेले आहेत. (Latest Political News)
स्थानिक राजकारणात आपल्याला डावलले जात असल्याच्या मेधाताईंच्या मतावर गडकरी काय आणि कसा मार्ग काढणार हे पुढच्या काही मिनिटात कळू शकेल. त्यासाठी गडकरींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेधाताई यांच्यात समेट घडवून आणावा लागेल. मात्र पुण्यातील या गटबाजीत गडकरींनाच लक्ष घालावे लागण्याची उलट-सुलट चर्चा आहे.
समाज माध्यमातून मेधाताईंनी काल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नीलम गोर्हे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह पुण्यातील आमदार व मेधा कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी बोलणे टाळून कार्यक्रमानंतर बोलू असे सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
"माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. मला विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही नाही, पण आता दुःख मनात मावत नाही. त्यामुळे तुमच्याशी बोलावे वाटले. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पाहिली आणि खूप वाईट वाटले," असे टि्वट मेधा कुलकर्णी यांनी केले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.