पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : राष्ट्रवादी प्रवेशावेळी शरद पवारांनी मला हा शब्द दिला होता;महेश कोठेंनी उघड केले गुपित

आता आमची यादी पक्की आहे. अनेक जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागणार आहे, असे शरद पवारांनी मला सांगितले होते.

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : आम्हाला आमदारकी तर पाहिजेच आहे; पण त्याचबरोबरच सोलापूरला आयटी पार्क मिळावे, अशी अपेक्षा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावेळी व्यक्त केली होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं होतं की, मी आता तुम्हाला एमएलसी (विधान परिषद सदस्यत्व) काय देऊ शकत नाही. पण, तुम्ही तयारी करा; आम्ही सर्व ताकद तुमच्या पाठीशी लावू, असा शब्द मला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला होता, असे सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांनी सांगितले. (Sharad Pawar had given me this word at the time of NCP entry : Mahesh Kothe)

सोलापूर येथे पाहिल्या आयटी पार्कचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात महेश कोठे बोलत होते. कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशावेळी झालेल्या गोष्टींवर प्रथमच भाष्य केले. ते म्हणाले की, त्यावेळी मी आमदारकीबरोबरच सोलापुरात आयटी पार्क मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी आमदारकी मी आता तुम्हा देऊ शकत नाही. कारण, आता आमची यादी पक्की आहे. अनेक जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागणार आहे, असे सांगितले होते. मात्र, आयटी पार्कबाबत खात्री दिली होती. त्यामुळे पवारांशिवाय सोलापूरचे आयटी पार्क हे स्वप्नच राहिले असते.

सोलापुरात आयटी पार्क व्हावं, असं मी अनेक वर्षांपासून स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी अनेक नेत्यांना भेटलो. मराठा चेंबर्समध्ये बैठक घेतली. मात्र, त्यात दहा वर्षे गेली. नवा उद्योग सोलापुरात चालू शकेल, असा सर्वांच्या मनात प्रश्न होता. पण, आर्यन्स ग्रुपला मी भेटलो होतो. अतुल चोरडिया यांना पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बोलावून आपल्याला सोलापूरमध्ये आयटी पार्क करायचे आहे, असे सांगितले होते. आयटी पार्कमध्ये मोठे नाव असलेले असलेले दोन मोठी व्यक्तीमत्व आज आपल्याकडे आले आहेत. त्यामुळे आज आपले भाग्य आहे, असेही कोठे यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणांचा हा कार्यक्रम रविवारी व्हावा, अशी अपेक्षा होती. त्याबाबतची विनंती शरद पवार यांनी मान्य केली. त्यामुळे हा कार्यक्रम दोन ऑगस्ट ऐवजी १३ ऑगस्टला ठरला. त्यामुळे सोलापूरच्या मदतीला पुणेकर धावून आले आहेत. सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिवा, असा ऐतिहासिक क्षण आजचा आहे. पुढच्या एप्रिलच्या आतमध्ये हा आयटी पार्क चालू होईल. काही काळात आर्यन ग्रुपचे मोठे उद्योग सोलापुरात येतील.

शरद पवार यांची सोलापूरवर कायम कृषादृष्टी राहिली आहे. सोलापुरातील सामान्यातील सामन्य माणूस जरी त्यांच्याकडे गेला, तरी ते त्याला भेटतात. हा माझा गेल्या दोन वर्षांतील अनुभव आहे. त्याच्या आधीही बघत होते. पण, गेल्या दोन वर्षांत मला साहेबांच्या जवळ जाता आलं. साहेबांनी एकदा का जवळ केलं, तर काय होतं? हे आपल्या सर्वांना माहिती आहे, ते वेगळं सांगण्याची गरज नाही. आता सोलापूरकरांनी शरद पवार यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही कोठे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT