Delhi News : नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. याच मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला होता. यावर पंतप्रधान मोदींनी दीर्घ भाषणातून उत्तरही दिले.
पंतप्रधान मोदींच्या याच भाषणावर C-Voter या संस्थेने सर्वेक्षण केले आहे. या सर्व्हेत विचारण्यात आले की, पंतप्रधानांनी संसदत मणिपूरच्या मुद्द्यावर भाषणातून दिलेल्या उत्तरावर तुम्ही समाधानी आहात का? विशेष म्हणजे यावर निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी मोदींच्या उत्तराने समाधानी असल्याचे सांगितले. (Latest Marathi News)
सी व्होटरच्या या सर्व्हेत, 'मणिपूरवर मोदींनी भाषणातून दिलेल्या उत्तरावर तुम्ही समाधानी आहात का? या उत्तरावर आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. या प्रश्नावर ५१ टक्के लोकांनी 'हो' असे म्हटले आहे. तर ३८ टक्के लोकांनी 'नाही' म्हणत मोदींच्या भाषणावर असमाधान व्यक्त केले आहे. तर उर्वरीत १६ टक्के लोकांनी काहीही उत्तर दिलेले नाही.
संसदेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मोदींनी दोन तासांपेक्षा अधिक वेळ भाषण केले होते. याच भाषणावर सी व्होटरने देशभरातील विविध राज्यांतल्या काही लोकांच्या सहभागातून सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात एकूण 3 हजार 767 लोकांना मोदींच्या भाषणावर प्रश्न विचारण्यात आले होते. यातून ही आकडेवारी समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.