Sudhir Kharatmal-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : कोठे, बेरियांसमोर पवारांनी मला सोलापूर लोकसभेसाठी शब्द दिलाय; खरटमल लढण्यावर ठाम

NCP Leader News : त्यावेळी ‘पुन्हा दुसरा कोणी उमेदवार म्हणून आणू नका, यांनाच फायनल करा’ असा आदेशही पवार यांनी दिला असल्याचे सुधीर खरटमल यांचे म्हणणे आहे.

अरविंद मोटे

Solapur News : सोलापूर मतदारसंघ आमच्याकडे द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी खूप पूर्वीच केली होती. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुधीर खरटमल हेच लोकसभेचे उमेदवार असतील, असा शब्द महेश कोठे आणि यू. एन. बेरिया यांच्यासमोर दिला होता. यामुळे महाविकास आघाडीकडून आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल यांनी पुन्हा एकदा जाहीर केले. (Sharad Pawar has given me a word for Solapur Lok Sabha : Sudhir Kharatmal)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा रद्द झाल्याने पंढरपूर येथील महाविकास आघाडीची बैठकही रद्द झाली आहे. सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार, की राष्ट्रवादीकडे जाणार यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नुकत्याच झालेल्या धम्मचक्र परिवर्तनदिनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपण राजकरणातून निवृत्त होत असून, आमदार प्रणिती शिंदे याच लोकसभेची सोलापूरची जागा लढविणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच, या पार्श्वभूमीवर अजित पवार गटात असलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली आहे.

दरम्यान, सोलापूर लोकसभेची जागा या वेळी राष्ट्रवादीकडे असेल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांचे ‘कोण रोहित पवार’ हे उत्तरही खूप गाजले होते. त्यानंतर आयटी पार्कच्या उद्‌घाटनाला सोलापूरमध्ये शरद पवार आले असताना राष्ट्रवादीत नव्याने दाखल झालेले माजी महापौर महेश कोठे, यू. एन. बेरिया यांनी लोकसभेचे उमेदवार म्हणून सुधीर खरटमल यांचे नाव सूचविले होते. त्यावेळी ‘पुन्हा दुसरा कोणी उमेदवार म्हणून आणू नका, यांनाच फायनल करा’ असा आदेशही पवार यांनी दिला असल्याचे सुधीर खरटमल यांचे म्हणणे आहे.

आता सोलापूर लोकसभा काँग्रेस स्वत:कडेच ठेवणार की राष्ट्रवादीला सोडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदे यांचे नाव जवळपास जाहीर करून टाकले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर खरटमल अजूनही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत ठाम आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT