Gram Panchayat election : नारायण पाटलांच्या चिरंजीवाचे वडिलांच्या पावलावर पाऊल; सरपंचपदाच्या निवडणुकीपासून राजकीय श्रीगणेशा

Karmala politics : माजी आमदार पाटील यांची राजकीय सुरुवात जेऊरच्या सरपंचपदापासून झाली होती.
Jeur Gram Panchayat election
Jeur Gram Panchayat electionSarkarnama

Karmala News : करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील यांची १९९२ पासून एकहाती सत्ता आहे. माजी आमदार पाटील यांची राजकीय सुरुवात जेऊरच्या सरपंचपदापासून झाली होती. तेथूच आता त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हेही आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करत आहेत. जेऊरच्या सरपंचपदासाठी माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील उभे आहेत. त्यामुळे जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Former MLA Narayan Patil's Son Prithviraj Patil is contesting Gram Panchayat elections)

जेऊरचे सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी माजी आमदार नारायण पाटील गटाकून पृथ्वीराज पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात आमदार संजय शिंदे गट व इतर पाटील विरोधक यांनी नितीन भैरू खटके यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय बाळासाहेब एकनाथ करचे हे सरपंचपदासाठी अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे जेऊरच्या सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नारायण पाटील यांच्यानंतर पृथ्वीराज पाटील यांना मानणारी एक तरुण फळी संपूर्ण तालुक्यात तयार झाली आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. या शिवाय सामाजिक उपक्रमातही ते सहभागी होतात.

Jeur Gram Panchayat election
Kolhapur Loksabha Election 2024 : चेतन नरके नेमके कुणाचे? महाआघाडीचे की अजितदादांचा सल्ला मानणारे?

माजी आमदार नारायण पाटील यांची राजकीय कारकीर्द जेऊरच्या सरपंचपदापासून सुरू झाली, त्याच ठिकाणाहून त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हे आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. यापूर्वी त्यांनी कोणतेही राजकीय पद भूषवलेले नाही किंवा कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, बाजार समिती बिनविरोध झाल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बिनविरोध संचालक म्हणून त्यांना संधी देण्याचा आग्रह कार्यकर्ते करत असतानाही नारायण पाटील यांनी आपल्या मुलाला संधी न देता पाटील समर्थक नवनाथ झोळ यांना करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बिनविरोध संचालक म्हणून संधी दिली.

अपक्ष उमेदवार बाळासाहेब करचे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी जेऊर ग्रामपंचायतच्या कारभारावरत आक्षेप घेत अनेक वेळा आवाज उठवला. आंदोलने-उपोषण केली आहेत. बाळासाहेब करशील हेदेखील विरोधी गटातच सामील होते. जेऊरच्या सरपंचपदाची जागा ओबीसीसाठी राखीव असल्याने या जागेवर ओबीसी उमेदवारालाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी करचे यांची होती. त्यांची ही मागणी मान्य झाल्याने ते निवडणूक रिंगणात उतरले असल्याचे सांगण्यात येत आहे. जेऊर ग्रामपंचायतीच्या पाच प्रभागांमधून १५ ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले जाणार आहेत.

Jeur Gram Panchayat election
Sangli NCP News : जयंत पाटलांच्या सांगली राष्ट्रवादीतही लवकरच फेरबदल

जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व पाटील विरोधकांना एकत्र करण्यासाठी आमदार शिंदे गटाकडून माजी पंचायत समिती सभापती चंद्रहास निमगिरे, माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील व इतर शिंदे समर्थकांनी प्रयत्न केले. मात्र, सरपंच पदासाठी बाळासाहेब करचे यांचा उमेदवारी अर्ज राहिला आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून नितीन खटके हे गेले अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवण्यावर त्यांचा भर असतो.

नारायण पाटील हे १९९२ मध्ये सुरुवातीला जेऊरचे सरपंच झाले. तेव्हापासून जेऊरवर पाटील यांची सत्ता आहे. जेऊरचे सरपंच, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि २०१४ मध्ये आमदार, असा पाटील यांचा राजकीय प्रवास आहे.

Jeur Gram Panchayat election
PM Modi in Shirdi : विखेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; मोदींच्या दौऱ्यासाठी आलेल्या बस गाड्या पाठवल्या परत

जेऊर ग्रामपंचायतीवरील नारायण पाटील गटाची सत्ता घालवण्यासाठी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये बागल गटानेही मोठी ताकद लावली होती. मात्र, प्रत्येकवेळी मोठ्या मताधिक्याने पाटील यांनी आपली सत्ता राखली आहे. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी पाटील गटाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. सध्या जेऊर येथील बहुतांश बागल गटाचे कार्यकर्ते आमदार संजय शिंदे गटात गेले आहेत, त्यामुळे पाटील यांच्या विरोधात लढणारे बहुतांश कार्यकर्ते हे पूर्वीचे बागल समर्थक आहेत.

पाटील गटाची जेऊरमधील सत्ता घालवण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. पाटील गटाचे कार्यकर्ते फोडण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आमदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे समर्थक जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. त्यातच पाटील गटाचे माजी उपसरपंच बलभीम जाधव यांनी आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. याची वेळी प्रवेश केलेले माजी उपसरपंच अंगद गोडसे यांनी मात्र आपल्याला फसवून शिंदे गटात प्रवेश घडवून आणला. माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. मी आमदार नारायण पाटील यांचाच कार्यकर्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Jeur Gram Panchayat election
Jayant Patil : मोदींजी, तुम्ही खुशाल श्रेय घ्या ! जयंत पाटलांचा टोला; 'निळवंडे'च्या कामाची करून दिली आठवण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com