Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maha Vikas Aghadi: लोकसभा जागावाटपाबद्दल 'मविआ'चं काय ठरलं ? शरद पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar On Maha Vikas Aghadi : लोकसभेच्या जागावाटपाचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नेमका कसा असणार ?

Ganesh Thombare

Solapur News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. एकीकडे भाजपचे नेते मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणी करत आहेत, बैठका घेत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षही कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांपैकी आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढणार ? याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत मोठं भाष्य केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"महाविकास आघाडीच्या जागावाटपाची जी चर्चा सुरू आहे, यानुसार राष्ट्रवादी किती जागा लढवणार आहे ? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, "लोकसभेच्या जागावाटपाचा प्रश्न हा काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि काही छोटे पक्ष, आम्ही याबाबत आपापसात चर्चा करत आहोत. यासंदर्भात आमची महत्त्वाच्या पक्षांशी चर्चा झाली आहे, पण जी चर्चा राहिली ती दिवाळीनंतर सर्वजण एकत्र बसून चर्चा करणार आहोत. माजी खात्री आहे, आम्ही एकविचाराने लोकांसमोर पर्याय ठेवू", असे शरद पवार म्हणाले.

'मविआ'च्या जागावाटपाबद्दल काय आहेत चर्चा ?

महाविकास आघाडीचे लोकसभेसाठी जागावाटप जवळपास निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे. लोकसभेच्या 46 जागा लढण्याचा मविआचा निर्धार आहे, तर मित्रपक्षांसाठी दोन जागा सोडणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गट 22, काँग्रेस 14 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 10 जागांवर लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा अद्याप कोणीही दिलेला नाही. त्यामुळे आता दिवाळीनंतर नेमकं काय ठरतं, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT