Sharad Pawar-Ramraje Naik Nimbalkar-Ranjitshinh Naik Nimbalkar-Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitshinh Nimbalkar: 'शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत फडणवीस विरोधाचा नरेटिव्ह सेट केला..' निंबाळकरांचा गंभीर आरोप

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 16 September : माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जातीयवादाचे विष पेरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नेरिटिव्ह सेट करण्याचे काम केले, असा आरोप नाईक निंबाळकर यांनी केला.

तसेच, रामराजेंवर शेलक्या शब्दांत टीका करताना ‘दरोड्यातील वाटाही ते घेतात,’ असा आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर केला.

रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) आज पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) जातीयवादाचे विष पेरून कुटिल राजकारण केले. इंग्रज गेले असले तरी शरद पवार त्यांचे जोडे घालून आजही फिरतात. ते कुटनितीचे राजकारण करत आहेत. तोडा फोडा आणि जोडा ही निती वापरून त्यांनी समाजा-समाजामध्ये जातीवादाचे विष पेरण्याचे काम केले आहे, असा आरोपही निंबाळकर यांनी केला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवरही जोरदार टीकास्त्र सोडले. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असेही नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे.

फलटण शहरातील सर्व खुनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सोबत फिरतात. दहशतवादी, मोक्का कारवाई झालेले आरोपी, हफ्ते घेणारे सर्वजण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. शहरात दरोडा पडला आणि त्यातील वाटणी घेण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत, अशी जहरी टीका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT