सातारा : कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माढ्याचे भाजपचे (bjp) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह तीन जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ranjit singh naik nimbalkar news update)
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध दिगंबर आगवणे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर कार्यकर्ता म्हणून दिगंबर आगवणे यांची ओळख होती.
न्यायालयाच्या आदेशानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांची पत्नी जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय ठाकूर आणि लतिफ तांबोळी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.(bjp mp ranjit singh naik nimbalkar booked for fraud case)
फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कारखान्याची खोटी बिले बनविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
खासदार निंबाळकर यांनी आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं आगवणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्याविरुद्ध भा.द.वि. 405, 406, 418, 420, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.