Narendra Patil-Rajesh Tope-Manoj Jarange Patil
Narendra Patil-Rajesh Tope-Manoj Jarange PatilSarkarnama

Rajesh Tope : राजेश टोपेंनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला भडका लावला; फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा आरोप

Maratha Reservation : राजेश टोपेंची भूमिका तुम्ही पाहिली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातली वेगळी होती. उद्धव ठाकरे यांच्या सरकार मधली वेगळी होती.
Published on

Solapur, 16 September : मराठा आरक्षणाचा प्रवास मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला नाही, तो अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला आहे. केंद्र सरकारने दिललं ईडब्ल्यूएस आरक्षण हे मराठा बांधवांच्या हिताचं आहे. राज्य सरकारमध्ये मंत्री असताना राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कधी मदत केलेली नाही.

मात्र, विरोधात असताना आंदोलनाला भडका लावण्याचे काम करत आहेत, असा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या नरेंद्र पाटील यांनी केला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने राजेश टोपेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

ते म्हणाले, राजेश टोपेंची भूमिका तुम्ही पाहिली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातली वेगळी होती. उद्धव ठाकरे यांच्या सरकार मधली वेगळी होती.

राजेश टोपे (Rajesh Tope) मंत्री म्हणून किती वेळा आंदोलनाला सामोरे गेले आहेत. त्यांनी त्यावेळी किती वेळा जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चिघळण्याच्या आधी राजेश टोपे हे त्यांच्या शेजारी बसलेले पाहायला मिळायचे.

Narendra Patil-Rajesh Tope-Manoj Jarange Patil
Dhangar Reservation Agitation : धनगर आरक्षण उपोषणाच्या मंचावर दोन नेत्यांमध्ये बाचाबाची

मंत्री असताना राजेश टोपे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात मदत करत नाही. मात्र, विरोधात असताना आंदोलनाला भडका लावण्याचे काम करतात. राजेश टोपेंसारखा माणूस आंदोलनाचा काय कार्यक्रम करू शकतो, हे दाखवून दिले आहे, असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला.

Narendra Patil-Rajesh Tope-Manoj Jarange Patil
Sadabhau Khot : महाविकास आघाडीतील वळूंना अन्‌ रेड्यांना निवडणुकीत फोडून काढणार; सदाभाऊ कडाडले

ईडब्ल्यूएस आरक्षणावरही नरेंद्र पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत समाजकारणापेक्षा राजकारण घुसताना पाहिलं मिळत आहे. केंद्र सरकारने दिललं ईडब्ल्यूएस हे मराठा बांधवांच्या हिताचं आहे. दहा टक्के आरक्षण सर्व ठिकाणी लागू होऊ शकतं. दोघांच्या वादात कोण जिंकतं का कोण हरतं, हे महत्वाचं नाही. मराठा चळवळ आता राजकारणाच्या दिशेने गेलं

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com