Nilesh lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nilesh Lanke News : प्रतीक्षा संपली, नीलेश लंकेंचं ठरलं? प्रचाराच्या ताफ्यात पवार, सुळे अन् तुतारी...

Lok Sabha Election 2024 : अहमदनगर येथून भाजपने पुन्हा सुजय विखे यांना उमेदवारी दिली आणि 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असलेले आमदार नीलेश लंके महाविकास आघाडीत जाण्याच्या तयारीत

Sunil Balasaheb Dhumal

Ahmednagar Political News : लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपने आपल्या जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत राज्यातील 20 जणांच्या नावांचा समावेश केला आहे. यात अहमदनगर येथून भाजपने पुन्हा सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असलेले आमदार नीलेश लंके यांनी महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 'घड्याळ' सोडून ज्येष्ठ नेते शरद पवारांची 'तुतारी' वाजवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

पुणे येथे आमदार लंके (Nilesh Lanke) यांच्या 'मी अनुभवलेला कोविड' या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी पारनेरहून पुण्याला निघालेल्या लंकेंच्या ताफ्यात घड्याळ सोडून तुतारीला जागा देण्यात आली आहे. या ताफ्यातील वाहनांवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), आमदार लंके, त्यांच्या पत्नी राणी लंके आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह तुतारीचे स्टिकर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकाशनाच्या सोहळ्यातच लंके तुतारी वाजवणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नीलेश लंकेंनी गेल्या काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. दरम्यान, भाजपकडून सुजय विखेंना (Sujay Vikhe) तिकीट मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती. त्यामुळे नगरमधून महायुतीत कुणाला उमेदवारी मिळणार, याचीच लंके प्रतीक्षा करत असावेत. दरम्यान, बुधवारी भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सुजय विखेंचे नाव आले. त्यानंतर हालचालींना वेग आला आणि लंकेंनी आपली भूमिका स्पष्ट करत 'तुतारी' वाजवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, लंकेंनी नगर लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन करून वातावरण निर्मिती केलेली आहे. अभिनेते, खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचे प्रयोगाचे आयोजन केले होते. त्यामुळे लंके हे महाविकास आघाडीतील शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर पुण्यात कोल्हे (Amol Kolhe) आणि लंके यांची भेट झाली होती. त्यावेळी लंकेंनी 'वेट अँड वॉच' असे सूचक विधान केल्याने त्या चर्चेला जोर मिळाला होता. आता त्यांच्या ताफ्यावरच तुतारी आणि शरद पवारांचे स्टिकर लागल्याने लंकेंची प्रतीक्षा संपली असून, ते विखेंविरोधात आघाडीचे उमेदवार असतील, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT