Kalyan Loksabha News : कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत खलबतं; शिंदे, पवार गटात शाब्दिक चकमकी...

Eknath Shinde : महायुतीमधील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात लोकसभेच्या सीटवरून रस्सीखेच चालू असून, दोन्ही पक्षांतील नेते एकेमकांना डिवचत आहेत
Ajit Pawar, Shrikant Shinde, Eknath Shinde
Ajit Pawar, Shrikant Shinde, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Loksabha News : कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुन्हा संधी देण्यात येईल, याची जोरदार चर्चा आहे. मात्र, सध्याच्या घडीला महायुती मित्रपक्षातील वातावरण पाहता एकमेकांना डिवचण्याची कोणतीही संधी पक्षातील पदाधिकारी सोडत नाहीत.

शिंदे यांना निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यावं, असा सल्ला मनसेने दिला आहे. तर राष्ट्रवादी पक्षाची नाराजी लवकरच दूर करण्यात येईल. परांजपे आमच्या सोबत असतील असे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. यामुळे एकमेकांची बाजू पक्षातील बडे पदाधिकारी सावरून घेत असले, तरी पक्षातील अंतर्गत वातावरण याने ढवळून निघत आहे.

महायुतीमधील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात लोकसभेच्या सीटवरून रस्सीखेच चालू असल्याचे वारंवार आता दिसून आले आहे, तर दोन्ही पक्षातील नेते एकेमकांना डिवचताना दिसत आहेत. शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बारामती निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी या नेत्यांना समजून सांगा,अन्यथा कल्याण मतदारसंघाचा निकाल वेगळा लागू शकतो, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहॆ.

यावरून आता मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत एक सल्ला खासदार डॉ. शिंदे यांना दिला आहे. मनसे आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणी कितीही आटापिटा केला तरी, या वेळी कल्याण लोकसभेतील या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याची भाषा कोणत्याही उमेदवाराने करू नये.

या मतदारसंघातील उमेदवार हा काठावरच पास होणार आहे, तर निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे, असा सल्ला नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, माजी खासदार आनंद परांजपे यांच्या वक्तव्यावरून आता भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की मी आनंदजी बोलेल, जी त्यांनी नाराजी व्यक्त केली, ती येणाऱ्या काळामध्ये होणार नाही.

येणाऱ्या काळात परांजपे आमच्या सोबत कार्यक्रमामध्ये असतील, कुठेही नाराजगी असणार नाही, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात परांजपे यांना सोबत घेतले जाईल का? त्यांची नाराजी दूर केली जाईल का? हे पाहावे लागेल.

Edited By : Umesh Bambare

R

Ajit Pawar, Shrikant Shinde, Eknath Shinde
Kalyan-Dombivli Budget : कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना राष्ट्रगीताचा विसर; बजेटमध्ये मागील घोषणांची पूर्तता नाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com